Video : टेनिस क्रिकेटर उस्मान पटेल आणि इशान किशनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

Usman Patel And Ishan Kishan : आयपीएल 2023 (IPL 2023)मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयी घोडदौड करत आहे. मुंबईने आपल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. पंजाबने दिलेल्या 215 धावांच्ा विशाल लक्ष्याचा पाठलाग मुंबईने सहजरित्या केला. या विजयात हिरो ठरला इशान किशन. त्याने अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश केला आणि सर्वांची मने जिंकली. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इशान किशनने टेनिस क्रिकेटरचा स्टार खेळाडू मानला जाणारा उस्मान पटेलला फोटो दिला. या फोटोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उस्मान पटेल हा टेनिस क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाज आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटर म्हणून उस्मानची ओळख आहे. त्याला रायगडचा टायगर असेही म्हटले जाते. टेनिस क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धांमध्ये तो आपली चमक दाखवतो. शिवाय भारताबाहेरील स्पर्धांमध्येही त्याने अफलातून फलंदाजी केल्याचे आपण अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिले आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : सोनं सोडा, चांदीही झाली ‘प्रचंड’ महाग..! 1 किलोसाठी ‘इतकी’ किंमत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इशान किशन उस्मान पटेलसोबत फोटो घेताना दिसत आहे. फोटो घेतल्यानंतर समाधानी भावना उस्मानच्या चेहऱ्यावर दिसत होती. इशान किशन यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इशान किशनने पंजाब किंग्जविरुद्ध अवघ्या 41 चेंडूंत 75 धावांची नाबाद खेळी खेळली, त्यात चार षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 182.93 होता.या सामन्यात इशान किशनला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment