

Karan Ambala : गावोगावी, युट्यूबवर, अनेक जिल्ह्यात, विविध राज्यात तुफान चाललेली गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट. या गोष्टीला व्यावसायिक रुप प्राप्त झालं आणि त्याचा विस्तारच फोफावला. लाखोंची बक्षिसं, आकर्षक वस्तू, कार, बाईक विजेत्याला मिळत असल्याने त्याच्या चर्चा साध्यातल्या साध्यात किंवा अडाणी माणसांमध्येही रंगतात. यात टॉपच्या स्तरावर खेळणारे खेळाडू तितकीच प्रसिद्ध. सोशल मीडियाच्या काळातच टेनिस क्रिकेटचा विकास झाला त्यामुळे या खेळाडूंचं नशिबही बदललं. त्यातलंच देशातील एका टॉपच्या खेळाडूचं नाव म्हणजे करण अंबाला. आता हाच करण अंबाला आयपीएलचा भाग झालाय.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे आयएसपीएल ही टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा. यात करण अंबाला खेळतो, तसा तो अनेक स्पर्धा गाजवत इतपर्यंत पोहोचला. पहिल्या हंगामाचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून करण स्टार झाला. अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या मुंबईनं त्याला संघात घेतलं आणि करणने संधीचं सोनं केलं. यंदाचा हंगाम त्याच्याच संघाने जिंकला. करणचं खरं नाव अभिषेक दल्होर असल्याचं याच स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना समजलं. आता करण आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नेट बॉलर असेल.
So happy for Abhishek Dalohar ( Karan Ambala ). I've been watching him for a very long time..
— CHIKU JI❤️💫 (@MaticKohli251) April 9, 2025
His name comes first in India when you talk about tennis cricket and now he's been picked by KKR as a net bowler.
He troubled almost all their batters.#IPL2025 pic.twitter.com/tN2D78kSUM
Abhishek Dalhor, also called Karan Ambala, who plays for Majhi Mumbai team in ISPL, which is owned by Amitabh & Abhishek Bacchan, has been picked as net bowler for Kolkata Knight Riders. The Ambala lad is first ISPL product to have been picked up by an IPL team #ISPL @ispl_t10 pic.twitter.com/71z6gVW1xx
— Gaurav Gupta (@toi_gauravG) April 9, 2025
करणनेच याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. करण खूप प्रतिभावान आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो बेसबॉल शैलीत मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. तो फक्त २५ वर्षांचा असून त्याच्याकडे खेळण्यासाठी भरपूर वेळ आहे. आयएसपीएलच्या पहिल्या लिलावात, माझी मुंबई संघाच्या मालकांनी त्याला २७ लाख रुपयांना संघात दाखल केले. पहिल्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आणि मालिकावीर ठरला. त्याने ५ लाख रुपये बक्षीस रक्कम आणि शिल्ड जिंकली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!