बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीने मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा मोठा रेकॉर्ड!

WhatsApp Group

Virat Kohli Century : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटीत इतिहास रचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत शतक झळकावून सर डॉन बॅडमन यांचा विक्रम मोडला. पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (24 नोव्हेंबर) कोहलीने ही कामगिरी केली. पर्थ कसोटीत कोहलीने कारकिर्दीतील 30वे कसोटी शतक झळकावले. या बाबतीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके झळकावणाऱ्या सर डॉन बॅडमन यांना मागे टाकले आहे. कोहलीने कारकिर्दीतील 202 व्या डावात हे शतक झळकावले आहे. तसेच, कारकिर्दीतील 30 वे कसोटी शतक झळकावल्यानंतर कोहलीने या बाबतीत मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांची बरोबरी केली आहे.

पर्थ कसोटीत कोहलीने शानदार फलंदाजी केली. शतक झळकावण्यासाठी त्याने 143 चेंडूंचा सामना केला. 100 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. कोहलीने शतक झळकावताच भारताचा डाव 6 गडी बाद 487 धावांवर घोषित करण्यात आला. अशाप्रकारे भारतीय संघाने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 12 अशी अवस्था झाली आहे.

हेही वाचा – बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीचे 491 दिवसांनंतर शतक, अनुष्काला फ्लाईंग किस, पाहा Video

विराट कोहलीचे हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 81 वे शतक आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीने पर्थ कसोटीत 143 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 8 चौकार मारले.

सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके

विराट कोहली – 81
जो रूट – 51.
रोहित शर्मा – 48.

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 104 धावांत गुंडाळत 46 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने 487 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment