

Axar Patel Misses Hattrick Rohit Sharma Dropped : रोहित शर्मा पुढच्या काही दिवसांसाठी लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे. त्याला कारण पण खास आहे. रोहित शर्माने अक्षर पटेलची हॅट्ट्रिक चुकवली. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना ही मनाला लावणारी चूक केली. रोहितने स्लिपमध्ये एकदम सोपा झेल सोडला.
डावातील नववे षटक टाकणाऱ्या अक्षर पटेलला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. दुसऱ्याच चेंडूवर त्याने तन्जीद हसनला केएल राहुलकडून झेलबाद केले. यानंतर, पुढच्याच चेंडूवर, त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशफिकुर रहीमला आपला बळी बनवले. अक्षर चौथ्या चेंडूवर हॅट्रिक घेऊ शकला असता, पण रोहित शर्माच्या चुकीमुळे तो हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही. चौथ्या चेंडूवर झाकीर अलीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला स्पर्श करून स्लिपकडे गेला. रोहित शर्माला हा झेल घेता आला नाही आणि अक्षर तिसरा बळी हुकला.
Indian skipper Rohit Sharma drops a sitter, denying Axar Patel a hat-trick! 💔😥
— Sportskeeda (@Sportskeeda) February 20, 2025
The captain looks extremely disappointed and apologizes to the bowler for missing his big moment 🇮🇳🙏🏻#AxarPatel #RohitSharma #INDvBAN #ODIs #Sportskeeda pic.twitter.com/xX4inBxwa5
हेही वाचा – ‘मी आनंदी आहे, आता लोक विचारणार नाहीत, की तुझे नाव काय आहे?’ – विनीत कुमार सिंह
भारत आपला स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्यात भारताने बांगलादेशला पुरते झुकवले आहे. बांगलादेशने अवघ्या 35 धावांत 5 विकेट्स गमावल्या. यात अक्षरच्या आणि मोहम्मद शमी यांच्या प्रत्येकी 2 आणि हर्षित राणाच्या एकमेव विकेटचा समावेश आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!