

WI vs IND 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज बार्बाडोसमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना या मालिकेत आयसीसी विश्वचषकासाठी खेळाडूंना आजमावायचे आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आजच्या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
भारतीय संघ एकदिवसीय मालिकेदरम्यान विश्वचषकासाठी संघ निश्चित करू इच्छितो. या मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी मालिकेत 1-0ने विजय मिळवल्यानंतर आता वनडेत विजयाने सुरुवात करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. यजमान संघाने 17 वर्षांपासून भारताविरुद्ध एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. 2006 सालापासून विंडीज संघ विजयासाठी आसुसलेला आहे.
#TeamIndia have won the toss and elect to bowl first in the 1st ODI.
Live – https://t.co/lFIEPnpOrO… #WIvIND pic.twitter.com/TVjy1ks2aR
— BCCI (@BCCI) July 27, 2023
हेही वाचा – रॉयल एनफिल्ड आणतेय ‘बॉबर’ बाईक! टेस्टिंग दरम्यानचे फोटो व्हायरल
News from Barbados – Mukesh Kumar is all set to make his ODI debut for #TeamIndia 👏👏#WIvIND pic.twitter.com/TfbHMnv7in
— BCCI (@BCCI) July 27, 2023
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!