WI vs IND 1st Test : चौकार मारत रोहित शर्माने साकारले शतक, पुढच्या चेंडूवर माघारी!

WhatsApp Group

Rohit Sharma Hundred : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs IND 1st Test) पहिल्या कसोटीत शतक ठोकले आहे. डॉमिनिकामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारत आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात रोहितने शतक साकारले. रोहितपूर्वी यशस्वीनेही कसोटी पदार्पणात शतक साजरे केले. शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला.

एलिक अथानाझेने रोहितला झेलबाद केले. रोहितने 221 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा केल्या. 229 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. वेस्ट इंडिज पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट झाला.रोहित शर्माचे हे दहावे कसोटी शतक ठरले. रोहित आणि यशस्वी जयस्वाल ही पहिल्या डावात आघाडी घेणारी पहिली भारतीय सलामी जोडी ठरली आहे.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : यशस्वी भव! जयस्वालची पदार्पणात सेंच्युरी; 11 चौकारांची आतषबाजी

अश्विनची कमाल

भारतीय गोलंदाजांसमोर विंडीज संघाचे फलंदाज या सामन्यात विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा सलामीचा डाव 150 धावांवर आटोपला. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (आर अश्विन) दमदार गोलंदाजी करताना 5 बळी आपल्या नावावर केले. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 14 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून नवोदित अलिक अथानाजने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 99 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment