WI vs IND 2nd Test : रोहित शर्माचा धडाका, षटकार मारून अर्धशतक ठोकलं आणि…

WhatsApp Group

WI vs IND 2nd Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून तो फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने झंझावाती पद्धतीने अर्धशतक पूर्ण केले. रोहितने केमार रोचच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले 15 वे अर्धशतक पूर्ण केले. या षटकारासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडला.

रोहित शर्माने 74 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. 48 च्या वैयक्तिक स्कोअरवर असताना त्याने केमार रोचच्या पुल शॉटवर षटकार ठोकला. या डावातील हा दुसरा षटकार होता आणि या षटकारामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 74 षटकार ठोकले आहेत, तर पाँटिंगच्या नावावर 73 षटकार आहेत. रोहितपाठोपाठ यशस्वी जयस्वालनेही अर्धशतक पूर्ण केले आहे. 25 षटकात भारताने बिनबाद 119 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर गुप्तहेर? ही ISI संस्था काय आहे?

दोन्ही संघांची Playing 11

भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज – क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment