

WI vs IND 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात विंडीजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातही विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघाबाहेर असून ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे.
तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. विंडीजने दुसरा एकदिवसीय जिंकून मालिकेत दमदार पुनरागमन केले. भारतीय संघाने गेल्या 17 वर्षांत विंडीजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. सध्याच्या दौऱ्यावर भारतीय संघ आगामी विश्वचषकासाठी संयोजनाच्या शोधात आहे. भारत आणि विंडीज यांच्यात आतापर्यंत 96 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 48 जिंकले आहेत, तर विंडीजच्या खात्यात 44 विजय आहेत.
West Indies have won the toss and elect to bowl first in the ODI series decider.
Live – https://t.co/K4OdgD66PY… #WIvIND pic.twitter.com/aVEXKzFTJT
— BCCI (@BCCI) August 1, 2023
हेही वाचा – Maharashtra : कोथिंबीर विकून लातूरचा शेतकरी बनला करोडपती, घेतली SUV गाडी!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जायडेन सील्स.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!