WI vs IND 5th T20 : वेस्ट इंडिजने रचला इतिहास, भारताचे ‘प्रयोग’ फसले!

WhatsApp Group

WI vs IND 5th T20 : झटपट क्रिकेटमध्ये आपणच राजा असल्याचे वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. विंडीजने भारताविरुद्धी टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. फ्लोरिडात पावसाच्या पकडापकडीत खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात विंडीजने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. भारताच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर चौफेर बाजूने टीका होत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवची अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला मालिकाविजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ब्रँडन किंग आणि निकोलस पूरनच्या योगदानामुळे 18व्या षटकातच विजय मिळवला. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्यांनी भारताला प्रथमच पराभूत केले आहे.

वेस्ट इंडिजचा डाव

टीम इंडियाला पहिले यश दुसऱ्या षटकात मिळाले. अर्शदीप सिंगने स्फोटक फलंदाज काइल मेयर्सला (10) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पण यानंतर निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी जबरदस्त फॉर्म धारण केला. दोघांनी 107 धावांची भागीदारी रचली. किंगने अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्माने पूरनचा अडथळा दूर केला. पूरनने 1 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावा केल्या. त्यानंतर किंगने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत विजय जवळ केला. विंडीजने 18 षटकातच हे लक्ष्य गाठले. किंगने 5 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 85 धावा केल्या.

हेही वाचा – ChatGPT बनवणारी कंपनी देतेय नोकरी, ₹3.7 कोटींपर्यंत मिळेल पॅकेज!

भारताचा डाव

यशस्वी जयस्वाल (5) आणि शुबमन गिल (9) या सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत 50 धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमार यादवच्या साथीने जोरदार फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माला रोस्टन चेसने त्याच्या चेंडूवर अप्रतिम झेल घेऊन बाद केले. 27 धावांची छोटी पण उत्कृष्ट खेळी केल्यानंतर तो बाद झाला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने त्याच्या वाट्याला आलेली आणखी एक मोठी संधी गमावली. या सामन्यात तो केवळ 13 धावा करून बाद झाला. निकोलस पूरनने रोमॅरियो शेफर्डच्या चेंडूवर विकेटच्या मागे त्याचा अप्रतिम झेल टिपला. सूर्यकुमारने 45 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. कर्णधार हार्दिक पंड्या 14 धावा करून झेलबाद झाला. 20 षटकात भारताने 9 बाद 165 धावा केल्या. विंडीजकडून शेफर्डने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रॉस्टन चेस.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment