IND vs AUS : भारताने गमावला वर्ल्डकपचा पहिला टॉस, रोहितसोबत ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग!

WhatsApp Group

IND vs AUS Toss Update And Playing 11 In Marathi : टीम इंडिया आजपासून विश्वचषक 2023 मोहिमेची सुरुवात करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. विश्वचषक 2023 चा हा एकूण पाचवा सामना आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. दोन्ही संघांकडे तगडे फिरकीपटू आहेत. त्यामुळे आज कोणता संघ सामना जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिल आजारी असून इशान किशन रोहितसोबत सलामीला येईल.

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा (World Cup 2023 IND vs AUS News In Marathi) रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ 8 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, भारतीय संघ केवळ 4 सामने जिंकू शकला आहे. 1987 च्या विश्वचषकात चेन्नई येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एका धावेने पराभव केला होता. अशा परिस्थितीत रोहित शर्मालाही 36 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घ्यायला आवडेल.

हेही वाचा – IND Vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे हवीयत? जाणून घ्या कशी खरेदी कराल!

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 IND vs AUS)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – डेडेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कप्तान), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment