

World Cup 2023 SA vs NED In Marathi : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात नेदरलँड्सचा संघ दक्षिण आफ्रिकेशी खेळत आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना 2 तास उशिरा सुरू झाला आणि आता तो 50 ऐवजी 43-43 षटकांचा करण्यात आला. कर्णधार स्कॉट एडवर्डच्या 78 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर नेदरलँड्सने 8 गडी गमावून 245 धावा केल्या आहेत.
नेदरलँड्सचे अफलातून कमबॅक (SA vs NED)
धर्मशाला येथे रंगत असलेल्या सामन्यात नेदरलँड्सने जबरदस्त कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने एका वेळी अवघ्या 82 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर नेदरलँडचा संघ केवळ 150 धावाच करू शकेल असे वाटत होते, परंतु स्कॉट एडवर्ड्स आणि रॉल्फ व्हॅन डर मर्वे यांनी आठव्या विकेटसाठी 64 धावांची खेळी करत संघाचा डाव फिरवला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 69 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 78 धावा केल्या. तर रॉल्फ व्हॅन डर मर्वेने 19 चेंडूत 29 धावांची तर आर्यन दत्तने 9 चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जान्सेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हेही वाचा – अकाऊंटमध्ये बॅलन्स पाहून कामगार हँग, 2 अब्ज 21 करोड रुपये!
दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 SA vs NED)
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीड, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!