World Cup 2023 : बांगलादेशला हरवल्यानंतर सेमीफायनलमध्ये जाणार भारत?

WhatsApp Group

World Cup 2023 Semi Final Equation In Marathi : सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंका वगळता सर्व 9 संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून खळबळ उडवून दिली. या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा प्रवास खूपच छान झाला आहे. किवी संघाने पहिले चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघ आज चौथा सामना आज (19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळत आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते पुन्हा न्यूझीलंडला मागे टाकतील आणि किवी संघासह उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल.

बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, पुढील 2 सामने जिंकले, तर 6 विजयांसह आणि 12 गुणांसह भारत उपांत्य फेरीसाठी मजबूत दावा करेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. मग रोहित आणि ब्रिगेडला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

हेही वाचा – Video : फुटपाथवरून चालणाऱ्या महिलांना धावत्या कारने उडवले, एकीचा जागीच मृत्यू!

बांगलादेशचा पराभव करून पुढील 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे 7 सामन्यात एकूण 14 गुण होतील. सध्या भारतीय संघ 3 सामने जिंकून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित 6 पैकी किमान 3 ते 4 सामने जिंकावे लागतील.

भारतीय संघाला पुण्यात बांगलादेशविरुद्ध चौथा सामना खेळायचा आहे. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाला धर्मशाला येथे न्यूझीलंड, लखनऊमध्ये इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याशी स्पर्धा होऊ शकते. बांगलादेश आणि नेदरलँड हे उलथापालथ घडवण्यात तज्ञ आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबाबतही भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.

भारतीय संघाचे पुढील सामने

  • 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
  • 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
  • 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
  • 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
  • 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरू

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment