WPL 2024 | श्रेयांका पाटीलने जिंकली पर्पल कॅप, फायनलमध्ये दिल्लीला झुकवलं, RCB च्या विजयाची शिल्पकार

WhatsApp Group

Shreyanka Patil | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद (RCB Win WPL 2024) जिंकले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव करत चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. दुसरीकडे दिल्लीला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पहिल्या सत्रातही त्यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने विजेतेपदाच्या सामन्यात दिल्लीला 113 धावांवर रोखले होते.

आरसीबीच्या या विजयाची शिल्पकार ठरली, ती मराठमोळी फिरकीपटू श्रेयांका पाटील. तिने 4 बळी घेत दिल्लीला धक्के दिले. तिने यंदाच्या पर्वात सर्वाधिक बळी घेण्याचा रेकॉर्ड केला, त्यामुळे तिच्या या दमदार कामगिरी बद्दल तिला पर्पल कॅप आणि 5 लाख रुपये बक्षीस मिळाले. “श्रेयांका पाटील ही भविष्यासाठी एक खरी खास स्टार आहे”, असे आरसीबीची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने म्हटले.

114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाईन यांनी आरसीबीला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज शिखा पांडेने 9व्या षटकातील पहिल्या चेंडूवर डिव्हाईनला एलबीडब्ल्यू केले. तिने 27 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या. मिनू मणीने मंधानाला अरुंधती रेड्डीकरवी झेलबाद करून आरसीबीला दुसरा धक्का दिला. मंधाना 39 चेंडूत 31 धावा करून बाद झाली. एलिस पेरीने नाबाद 35 धावा केल्या तर रिचा घेश 17 धावा करून नाबाद परतली.

हेही वाचा – “रेव्ह पार्टीत सापाचं विष…”, एल्विश यादवची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली!

तत्पूर्वी, फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा डाव 18.3 षटकांत 113 धावांवर आटोपला. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीवीर शेफाली वर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. त्याच्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने 23 धावांचे योगदान दिले. आरसीबीसाठी श्रेयंका पाटील सर्वोत्तम गोलंदाज ठरली, तिने 3.3 षटकात 12 धावा देत 4 बळी घेतले. सोफी मोलीक्सने एका षटकात तीन बळी घेतले. त्याने चार षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. आशा शोभनाने दोन गडी बाद केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment