

WTC Final 2023 IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. इंग्लंडच्या ओव्हलमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी संपूर्ण देशाच्या नजरा अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीकडे लागल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने भारतीयांना धक्का दिला. त्याने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना बाद केले.
पाचव्या दिवशी 47वे षटक स्कॉट बोलँडने टाकले. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला फसवले. बाहेरचा चेंडू खेळण्याच्या नादात विराटने स्लीपमध्ये झेल दिला. स्टीव्ह स्मिथने त्याचा जबरदस्त झेल घेतला. पाचव्या चेंडूवर बोलँडने रवींद्र जडेजाला शिकार बनवले.
Ravi Shastri said, "Steven Smith drops nothing of Virat Kohli. He takes everything, even a blinder". pic.twitter.com/RP7uGX97bJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 11, 2023
हेही वाचा – WTC Final 2023 : मॅचमध्ये अंपायरची हात जोडून विनवणी, काय आहे प्रकरण? पाहा Video
संक्षिप्त धावफलक
- नाणेफेक – भारत (गोलंदाजी)
- ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 469 (ट्रॅव्हिस हेड 163, स्टीव्ह स्मिथ 121, मोहम्मद सिराज 108/4)
- भारत पहिला डाव – सर्वबाद 296 (अजिंक्य रहाणे 89, पॅट कमिन्स 83/3)
- ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 270/8 घोषित (अॅलेक्स कॅरी 66, रवींद्र जडेजा 58/3)
- भारत दुसरा डाव – 184/5 (47.5 पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात)
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!