

Anutin Charnvirakul Thailand Prime Minister 2025 : थायलंडच्या राजकारणात मोठा उलथापालथ करत अनुतिन चार्नविराकुल यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. अनुतिन हे एक यशस्वी उद्योगपती असून, कोविड महामारीच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांना ‘कॅनाबिस किंग’ म्हणूनही ओळखले जाते, कारण 2022 मध्ये त्यांनी गांजाला कायदेशीर करण्यासाठी सक्रिय समर्थन दिले होते.
थायलंडच्या संसदेत बहुमताची कमान अनुतिन यांच्या हाती
थायलंडच्या संसदेत 492 सक्रिय सदस्य आहेत. यापैकी 247 खासदारांनी अनुतिन यांना पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांचे बहुमत स्पष्ट झाले. 5 सप्टेंबर रोजी संसदेत झालेल्या मतदानात अनुतिन यांनी विजय मिळवला.
ते गेल्या दशकभरात थायलंडच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ मानले जात होते. अखेर आता त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर झेप घेतली आहे.
हेही वाचा – IPL 2026 मध्ये धोनी खेळणार? CSK मध्ये ‘त्यांचं’ कमबॅक!
17 वर्षांत 5 पंतप्रधान हटवले
थायलंडमध्ये गेल्या 17 वर्षांमध्ये न्यायालयीन निर्णयांमुळे तब्बल 5 पंतप्रधान हटवले गेले आहेत. अनुतिन हे 2025 मध्ये निवडले गेलेले तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. अलीकडेच, माजी पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांना नैतिकतेच्या उल्लंघनात दोषी ठरवून पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या केवळ 10 महिन्यांच्या कार्यकाळात देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता होती.
थायलंडची अर्थव्यवस्था व्यापार आणि पर्यटनावर अवलंबून आहे. देश अमेरिकेला सर्वाधिक निर्यात करतो, पण 19% अमेरिकन टॅरिफमुळे GDP ची वाढ मंदावली आहे.
भविष्यातील मोठे पाऊल – 4 महिन्यांत संसद बरखास्तीचे आश्वासन
अनुतिन यांच्या भुमजैथाई पार्टीने संसदेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्ष पीपुल्स पार्टीशी समझोता करून पाठिंबा मिळवला आहे.
या करारानुसार, अनुतिन यांनी पुढील 4 महिन्यांत संसद बरखास्त करून नव्या सार्वत्रिक निवडणुकांचे आश्वासन दिले आहे.
गेल्या निवडणुकीत पीपुल्स पार्टीला सर्वाधिक मते मिळाली होती, पण त्यांनी शाही मानहानी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले.
गांजाबाबत खुले समर्थन – अनुतिन यांची भूमिका ठाम
अनुतिन यांना ‘कॅनाबिस किंग’ म्हटले जाते, कारण त्यांनी गांजाच्या वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचे समर्थन केले. 2022 मध्ये त्यांनी गांजाचे कायदेशिरीकरण केले होते, ज्यामुळे थायलंडमध्ये या बाबतीत क्रांतिकारक बदल झाला. त्यांचा विश्वास आहे की गांजा ही औषधी वनस्पती असून तिचा उपयोग आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरू शकतो. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाकडून या धोरणाला पुढील गती मिळण्याची शक्यता आहे.
भूतपूर्व गृहमंत्री – आता देशाचे नेतृत्व
58 वर्षीय अनुतिन हे अत्यंत रूढीवादी आणि देशभक्त आहेत. ते यापूर्वी पैतोंगटार्न यांच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद भूषवलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आता थायलंडमध्ये राजकीय स्थिरता आणि आर्थिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
थाकसिन शिनावात्रा यांचे अधःपतन – फ्यू थाई पार्टीला धक्का
अनुतिन यांची निवड ही फ्यू थाई पार्टीसाठी मोठा धक्का मानली जात आहे. हीच पार्टी थाकसिन शिनावात्रा यांच्या नेतृत्वाखाली 20 वर्षांहून अधिक काळ सत्ता स्थापनेत यशस्वी ठरली होती. थाकसिन 2001 ते 2006 दरम्यान पंतप्रधान होते, पण 2006 मध्ये लष्कराने त्यांची सत्ता उलथवून लावली होती. त्यामुळेच अनुतिन यांची निवड ही एक राजकीय पर्व बदलल्याची चिन्हं म्हणून पाहिली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा