चीनमध्ये वैद्यकीय चमत्कार! महिलेला ‘पायावर कान’ लावून वाचवले प्राण

WhatsApp Group

Ear Attached To Leg Surgery : चीनमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय इतिहासात नोंद होईल असे अविश्वसनीय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एका भीषण अपघातात डोक्याची त्वचा व कान सुटून गेलेल्या महिलेचा कान प्रथम तिच्या पायावर तात्पुरता जोडण्यात आला आणि नंतर तो पुन्हा डोक्यावर बसवण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

अहवालानुसार, ही घटना एप्रिलमध्ये घडली. ज्या कंपनीत ती महिला काम करत होती, तिथे जड मशीनरीमुळे तिच्या कानासोबतच डोक्याच्या मोठ्या भागाची त्वचा, मान आणि चेहऱ्यावरील त्वचा फाटून अनेक तुकड्यांत विभक्त झाली. अपघातानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने त्वचा आणि कान पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याच्या ऊतकांना व रक्तवाहिन्यांना गंभीर इजा झाल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली नाही.

पायावर कान जोडण्याचा अनोखा निर्णय

रुग्णाच्या डोक्याची त्वचा पूर्णपणे बरी होण्यासाठी वेळ आवश्यक होता. त्यामुळे डॉक्टरांनी कान वाचवण्यासाठी अत्यंत वेगळे समाधान शोधले—कान तिच्याच पायावर ग्राफ्ट करून लावण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पायातील रक्तवाहिन्या आणि त्वचेची जाडी ही कान टिकून राहण्यासाठी योग्य होती.

हेही वाचा – या गावात 30 वर्षांनंतर पहिल्यांदा बाळाचा जन्म झालाय!

ही प्रक्रिया अत्यंत नाजूक होती कारण कानातील नसांची जाडी केवळ 0.2 ते 0.3 मिलीमीटर इतकी सूक्ष्म असते. तब्बल 10 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर कान पायावर यशस्वीरीत्या जोडण्यात आला.

पाचव्या दिवशी मोठे संकट, 500 वेळा ब्लडलेटिंग

शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी रुग्णाला मोठे संकट आले. कानाकडे जाणारा रक्तप्रवाह थांबू लागला आणि कानाचा रंग काळपट होऊ लागला. कान वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सुमारे 500 वेळा मॅन्युअल ब्लडलेटिंग करून रक्तपुरवठा सुरळीत ठेवला. दरम्यान, महिलेच्या डोक्याची त्वचा पोटावरील त्वचा वापरून ग्राफ्ट करण्यात आली.

अखेरीस, सुमारे पाच महिने उपचार सुरू राहिल्यानंतर सूज कमी झाली आणि जखमा भरून आल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सहा तासांच्या शस्त्रक्रियेत तोच कान पुन्हा डोक्यावर बसवण्यात डॉक्टरांना यश आले.

महिला आता सुरक्षित, अजून लहान शस्त्रक्रिया बाकी

रुग्ण महिलेचे नाव ‘सन’ असे सांगितले जाते. ती आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाली असून तिचा चेहरा मोठ्या प्रमाणावर पूर्ववत झाला आहे. पुढील काळात भुवया व पायावरील खुणा सुधारण्यासाठी काही लहान शस्त्रक्रिया कराव्या लागतील.

या संपूर्ण प्रकरणाने वैद्यकीय जगतात नव्या शक्यता निर्माण केल्या आहेत. गंभीर जखमी रुग्णांचे अवयव वाचवण्यासाठी हा अनोखा प्रयोग भविष्यातही अनेकांसाठी जीवनदायी ठरू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment