श्वास घ्यायला त्रास होत होता… मग या दोन भावांनी कचरा उचलला आणि इतिहास घडवला!

WhatsApp Group

Indian Teenagers Recycling Waste : दिल्लीसारख्या प्रदूषणग्रस्त महानगरात श्वास घेणंही अवघड झालं असताना, दोन किशोरवयीन मुलांनी असा काही निर्णय घेतला की आज संपूर्ण देश त्यांच्याकडे आदराने पाहतोय. विहान अग्रवाल आणि नव अग्रवाल ही दोन नावं आज भारतातील पर्यावरण चळवळीची नवी ओळख बनली आहेत. ही गोष्ट केवळ कचऱ्याच्या व्यवस्थापनाची नाही, तर एका दम्याच्या आजारातून जन्मलेल्या क्रांतीची आहे.

दम्याचा झटका आणि कचऱ्याची जाणीव

विहान अग्रवाल यांना लहान वयातच दम्याचा त्रास सुरू झाला. सतत खोकला, श्वास घ्यायला त्रास—डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की दिल्लीचं प्रदूषण हीच यामागची मुख्य कारणं आहेत. 2017 मध्ये जेव्हा गाझीपूर कचरा डोंगराचा काही भाग कोसळून रस्त्यावर पसरला आणि त्यानंतर आग लागून संपूर्ण दिल्ली धुरात न्हाली, तेव्हा विहानला एक गोष्ट ठामपणे जाणवली, “दिल्लीचा कचरा नीट व्यवस्थापित झाला नाही, तर माझा दमा कधीच बरा होणार नाही.”

घरातून सुरू झालेली चळवळ

विहान आणि त्याचा भाऊ नव यांनी आपल्या घरातच ओला-सुका कचरा वेगळा करायला सुरुवात केली. मात्र महानगरपालिकेच्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांनी हा वेगळा कचरा उचलण्यास नकार दिला.

हेही वाचा – वय कमी, पण विचार मोठे! तरुण शेतकऱ्याने जैविक शेतीला दिली नवी ओळख; कॅन्सर रुग्णांसाठी पहिलं पीक!

15 घरांपासून 3,000 घरांपर्यंतचा प्रवास

या नकारानंतर त्यांनी शेजाऱ्यांना एकत्र केलं. 15 घरांनी एकत्र येऊन कचरा वेगळा करून देण्याचा आग्रह धरला. अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली. हीच बीजं पुढे “OneStepGreener” या उपक्रमाची ठरली. आज हा उपक्रम:

  • 14 भारतीय शहरांमध्ये सक्रिय
  • 3,000 हून अधिक घरांचा वेगळा कचरा संकलन
  • कचऱ्याचे अतिशय सूक्ष्म वर्गीकरण
    (वृत्तपत्र वेगळे, A4 पेपर वेगळा, PET प्लास्टिक वेगळं, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा)

यामुळे कचऱ्याचा पुनर्वापर अधिक परिणामकारक होतो.

20 लाख पाउंड कचऱ्याचा पुनर्वापर  

OneStepGreener ने अलीकडेच 20 लाख पाउंड (2 Million Pounds) कचऱ्याचा पुनर्वापर पूर्ण केला. विशेष म्हणजे, ही मात्रा म्हणजे दिल्लीतील 3.3 कोटी लोक एका दिवसात जितका कचरा निर्माण करतात, तितकीच! केवळ कचरा नाही, झाडंही लावली. हा उपक्रम केवळ कचऱ्यापुरता मर्यादित नाही. शहरी भागात झाडं लावून प्रदूषण कमी करण्याचं काम देखील OneStepGreener करत आहे.

आंतरराष्ट्रीय सन्मान

या उल्लेखनीय कार्यासाठी विहान आणि नव अग्रवाल यांना International Children’s Peace Prize ने सन्मानित करण्यात आलं, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापनातील त्यांच्या योगदानासाठी.  नव अग्रवाल सांगतो, “दिल्लीसारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि प्रदूषित शहरांपैकी एका शहरात जर हे शक्य असेल, तर जगात कुठेही शक्य आहे.”

आज हे दोन भाऊ हजारो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत, वय लहान असलं, तरी विचार मोठे असतील तर बदल नक्की घडतो, याचा जिवंत पुरावा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment