

Delivery Boy Saves Woman : चीनमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका डिलिव्हरी बॉयनं केवळ प्रसंगावधान ठेवून एका महिलेचा जीव वाचवला – आणि त्याच्या या धाडसी कृतीमुळे त्याचं नशीब पूर्णपणे पालटलं.
“चांगले कर्म केल्यास त्याचे फळ चांगलेच मिळते” – ही जुनी म्हण चीनमधील लियू जू या तरुण डिलिव्हरी बॉयसाठी खरी ठरली आहे. मध्य चीनमधील हुनान प्रांतात चेन (बदललेलं नाव) नावाच्या महिलेची आपल्याच कंपनीच्या फ्रीजरमध्ये अडकून मृत्यू होण्याची वेळ आली होती, पण त्याच क्षणी तिथून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयनं तिचा आवाज ऐकला आणि तिचा जीव वाचवला.
घटना नेमकी काय घडली?
31 ऑगस्टच्या संध्याकाळी चेन ही महिला आपल्या कोल्ड-चेन लॉजिस्टिक्स कंपनीच्या फ्रीजरमध्ये एकटीच काम करत होती. तेथे ती प्रोडक्ट्सची छंटाई करत होती. फ्रीजरच्या मुख्य दरवाजात एक छोटे दरवाजे होते, जे सुरक्षेच्या दृष्टीने दोन लोकांच्या मदतीनेच उघडले जाणे आवश्यक होते. पण चूक तिच्याकडूनच झाली – तिने दरवाजा पूर्णपणे उघडून काम केले आणि नंतर आत जाऊन तो घट्ट बंद केला.
काम संपवून बाहेर यायचा प्रयत्न करताना तिला समजले की दरवाजा अडकला आहे. बॅकअप स्विचसुद्धा काम करत नव्हता. त्यावेळी तिच्याकडे फोन नव्हता आणि ती उन्हाळी कपड्यांमध्येच होती. फ्रीजरचा तापमान शून्याच्या 20 डिग्री सेल्सिअस खाली सेट करण्यात आला होता – म्हणजे अत्यंत धोकादायक थंडी!
मृत्यू जवळच… पण आशेचा किरण
ती महिला फ्रीजरच्या दरवाज्यावर जोरात वस्तू फेकत होती – कोणीतरी तिचा आवाज येवो म्हणून. काही काळासाठी कोणाचाही प्रतिसाद नव्हता, पण तरीही तिने हार मानली नाही. ती चप्पलने दरवाजा ठोठावत राहिली, आणि नशीब बलवत्तर – लियू जू नावाचा एक डिलिव्हरी बॉय तिथून जात होता. त्याला तिचा आवाज ऐकू आला.
हेही वाचा – जगातील पहिली AI मंत्री, ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय, भ्रष्टाचारविरोधात जबाबदारी
त्यानं कोणतीही भीती न बाळगता तात्काळ मदत केली आणि 20 मिनिटांच्या प्रयत्नानंतर चेनला सुरक्षित बाहेर काढले. त्या वेळी ती जोरात थरथरत होती आणि शुद्धीत यायला तिला तब्बल दोन तास लागले.
महिलेची कृती – कृतज्ञतेचा नवा अध्याय!
महिलेने नंतर सांगितले, “कोणाचंही लक्ष न गेलं असतं, तर मी नक्कीच मरून गेले असते.” ती इतकी भावूक झाली की तिनं त्या डिलिव्हरी बॉयला स्वतःच्या कंपनीतील काही ‘शेअर्स’ दान करण्याचा प्रस्ताव दिला. एका छोट्या मदतीमुळे एका सामान्य तरुणाचं आयुष्यच पालटून गेलं.
ही घटना केवळ माणुसकीचा आणि धैर्याचा एक प्रेरणादायी नमुना नाही, तर ‘देणं आणि परतफेड’ यामधील सच्च्या नात्याची एक सुंदर कहाणी आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा