डॉली चहावाल्याची फ्रेंचायझी लाँच, 1600 पेक्षा अधिकांचा अर्ज, पण फक्त काहींनाच मिळणार..

WhatsApp Group

Dolly Chaiwala Franchise : सोशल मीडियावर आपला खास स्टाइल आणि चहा सर्व्ह करण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जाणारा ‘डॉली चहावाला’ आता फक्त एक स्ट्रीट व्हेंडर राहिलेला नाही, तो आता एक उद्योजक बनला आहे! डॉलीने नुकतीच आपल्या चहा ब्रँडची फ्रेंचायझी सुरू केली असून पहिल्याच आठवड्यात त्याला 1600 पेक्षा जास्त अर्ज मिळाले आहेत. नागपूरपासून सुरू झालेला हा चहा व्यवसाय आता मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगलोरसारख्या मोठ्या शहरांत पोहोचण्याच्या तयारीत आहे.

फ्रेंचायझी मॉडेलची वैशिष्ट्ये:

  • तीन टप्प्यातील फ्रँचायझी पॅकेज – स्टॉल, स्टोअर मॉडेल आणि फ्लॅगशिप कॅफे
  • डॉलीच्या ब्रँडिंगसह युनिफॉर्म, टी-शर्ट, आणि म्युझिक सेटअप
  • ‘डॉली स्टाइल’ सर्व्हिंग प्रशिक्षण
  • खास इंस्टा रील–फ्रेंडली डिझाइन

डॉली म्हणतो, “माझं स्वप्न होतं की माझ्या चहाच्या टपरीची ओळख भारतभर व्हावी. आता हे स्वप्न सत्यात उतरतेय.” स्टॉल ₹4.5 ते ₹6 लाखात, स्टोअर ₹20 ते ₹22 लाखांत, आणि कॅफे ₹39 ते ₹43 लाखांपर्यंत सुरू करता येणार आहे. 

हेही वाचा –Viral Video : हातात जिवंत साप, हजारो भक्तांची अनोखी पूजा, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!

सोशल मीडियावर ट्रेंड

लोकांनी त्याच्या व्यवसायिक स्मार्टनेसचं कौतुक केलं असून ‘#DollyChaiwala’ हा ट्रेंड Instagram, YouTube Shorts आणि Twitter वर व्हायरल होत आहे. याच्या स्टाईलची तुलना अगदी पुष्पा, रॉकी भाई सारख्या फिक्शनल कॅरेक्टरशी केली जातेय.

शिक्षण नाही, पण व्हिजन आहे!

लोक डॉलीच्या यशावर बोलताना म्हणतात, “शिक्षण महाग झालंय, पण व्हिजन आणि मेहनत अजूनही फ्री आहे!”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment