

Tax Free State Reason : आयटीआर भरण्याचा सीझन सुरू असताना संपूर्ण देशात कर भरण्याची धावपळ सुरू आहे. पण भारतात एक राज्य असं आहे जिथं लाखो-कोट्यवधींची कमाई करूनही नागरिकांना एक रुपयाचाही टॅक्स भरावा लागत नाही! हे विशेष सवलत त्यांना कशामुळे मिळते? जाणून घ्या.
कोणतं आहे हे राज्य जिथं टॅक्स भरावा लागत नाही?
देशातील प्रत्येक नागरिकाला 1961 च्या आयकर कायद्यानुसार कर भरावा लागतो. पण सिक्किम हे एकमेव राज्य आहे जिथल्या मूळ रहिवाशांना कलम 10(26AAA) अंतर्गत इनकम टॅक्समधून पूर्ण सूट मिळते. म्हणजे, हे नागरिक कितीही कमाई करत असले तरी त्यांना टॅक्स भरावा लागत नाही.
सिक्किममध्ये करमाफी का दिली जाते?
- सिक्किम 1642 साली स्थापन झाले आणि 1950 मध्ये भारत-सिक्किम शांतता करारानंतर भारताचं संरक्षित राज्य बनलं.
- या करारात एक अट ठेवण्यात आली होती की, सिक्किमच्या मूळ नागरिकांना कर भरावा लागणार नाही.
- 1975 मध्ये जेव्हा सिक्किम भारतात पूर्णपणे विलीन झाले, तेव्हा ही कर-सूट लागू झाली आणि धारा 10(26AAA) आयकर कायद्यात समाविष्ट करण्यात आली.
कोणाला मिळते ही कर-सूट?
- सिक्किम सब्जेक्ट्स रेग्युलेशन अंतर्गत नोंदणीकृत नागरिक किंवा
- 26 एप्रिल 1975 पूर्वी सिक्किममध्ये वास्तव्यास असलेले आणि त्यांचे वंशज
- आजघडीला सुमारे 95% सिक्किमची लोकसंख्या कराच्या जबाबदारीपासून मुक्त आहे.
सरकारने नियम का बदलले नाहीत?
नवीन टॅक्स स्लॅब आले असले, तरीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिक्किमसाठी टॅक्स नियमात कोणताही बदल केला नाही. कारण, या विशेष सवलतीचं ऐतिहासिक आणि कायदेशीर महत्व आहे.
सिक्किम हे भारतातलं असं एकमेव राज्य आहे जिथले नागरिक भरघोस कमाई करूनही टॅक्स फ्री आहेत. यामागे इतिहास, विशेष करार आणि भारतीय कायद्यातील विशेष कलम जबाबदार आहेत. त्यामुळे आजही सिक्किमचे नागरिक इतर राज्यांपेक्षा कराच्या बाबतीत एका वेगळ्याच विशेष स्थानावर आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!