सिंगापूरमध्ये अचानक जमीन कोसळली, कारसह महिला अडकली…भारतीय कामगाराची थरारक बचाव मोहीम!

WhatsApp Group

Indian Worker Rescues Woman In Singapore : सिंगापूरच्या तंजोंग कातोंग रोड साउथ परिसरात शनिवारी सायंकाळी एक मोठा सिंकहोल अचानक उघडला आणि एक कार त्यात कोसळली. या घटनेत एका भारतीय स्थलांतरित कामगाराने प्रसंगावधान राखून त्या कारमधील महिलेला वाचवले, आणि संपूर्ण सिंगापूरमध्ये त्याचं कौतुक केलं जात आहे.

ही धोकादायक घटना सिंगापूरच्या PUB (Public Utilities Board) च्या एका कार्यरत कामाच्या ठिकाणी घडली. पिचाई उदैयप्पन सुब्बैया, हे ४६ वर्षीय भारतीय फोरमॅन, यांनी प्रसंग पाहताच तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या तिघा सहकाऱ्यांना नायलॉन दोरी टाकायला सांगितली. या दोरीच्या साहाय्याने गाडीत अडकलेल्या महिलेला वर खेचण्यात आले आणि तिला तत्काळ रॅफल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा – वर्षात फक्त १ दिवस उघडणारं मंदिर; नागपंचमीला लाखोंचा जनसागर, दर्शनाने दूर होतो कालसर्प दोष!

पिचाई सुब्बैया गेल्या २२ वर्षांपासून सिंगापूरमध्ये काम करत आहेत. त्यांनी सांगितले, “माझ्या मनात भीती होती, पण एकच भावना होती, हिला वाचवलेच पाहिजे. आमचं संपूर्ण लक्ष आणि उद्दिष्ट हेच होत.”

या धाडसी कृतीमुळे सोशल मीडियावर पिचाई यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. लोकांनी त्यांना सिंगापूरचं नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्स (SCDF) कडून देखील या कामगारांचे आभार मानण्याची तयारी सुरू आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment