Indore Transgender Controversy : इंदूर शहरातील नंदलालपुरा परिसरात हिंदू किन्नर समाज आणि मुस्लिम किन्नर समूह यांच्यात मोठा वाद उफाळला आहे. हिंदू किन्नर समाजाच्या नेत्या सपना गुरु यांनी आरोप केला आहे की, मालेगाव येथून आलेल्या पायल उर्फ नईम अंसारी आणि सीमा हाजी उर्फ फरजान या मुस्लिम किन्नरांनी हिंदू किन्नरांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आणि त्यांना HIV संक्रमित इंजेक्शन लावले.
गंभीर आरोप
60 हून अधिक किन्नर HIV पॉझिटिव्ह, त्यापैकी 12 जणांचा उपचार एमवाय हॉस्पिटलच्या ART सेंटरमध्ये सुरू आहे. अनेक हिंदू किन्नरांनी हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून सादर केले असून व्हिडीओ पुरावे देखील दिले आहेत.
वादाची पार्श्वभूमी
सपना गुरु यांच्या म्हणण्यानुसार, पायल अंसारी 2000 मध्ये मालेगावहून इंदूरमध्ये आली होती, त्यानंतर तिने अनेक हिंदू किन्नरांवर दबाव टाकून धर्मांतर घडवले. सीमा हाजीने काही किन्नरांना जबरदस्तीने हज यात्रा करवली, असा आरोप देखील करण्यात आला आहे. पायल गटाने महाराष्ट्र व अन्य राज्यांतील मुस्लिम किन्नरांना इंदूरमध्ये बोलावून धमकी व दबाव वाढवला.
पोलिसांची कारवाई
प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी SIT (Special Investigation Team) स्थापन केली आहे. या टीममध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट असून सखोल चौकशी सुरू आहे. मारपीट, अपहरण व धमकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.
आरोग्य व सामाजिक धोक्याचे संकेत
वकील सचिन सोनकर यांच्या मते, संक्रमित इंजेक्शनमुळे इंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त मुस्लिम किन्नर HIV पॉझिटिव्ह आहेत. यामुळे इतर सामान्य नागरिकांमध्ये देखील संसर्गाचा धोका वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदू किन्नर समाजाची मागणी
सरकारने सुरक्षा पुरवावी, धर्मांतर थांबवण्यासाठी सखोल चौकशी व कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. किन्नर समाजात हे प्रकरण “किन्नर जिहाद” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!