ChatGPT चा सल्ला जीवावर बेतला! 60 वर्षीय व्यक्तीला विषबाधा, वाचा काय झालं!

WhatsApp Group

ChatGPT Health Advice Gone Wrong : आजच्या डिजिटल युगात, ChatGPT सारख्या AI चॅटबॉटवर आपली रोजची छोटीमोठी कामं सोपवली जात आहेत. “अहो ChatGPT! हे काय खावं? ते काय टाळावं?” अशा विचारांनी आपण इतके भरडलो आहोत की कधी कधी या सल्ल्यांचा फटका आपल्या आरोग्यालाच बसतो. असाच एक खतरनाक प्रकार नुकताच समोर आला आहे — जिथे AI चा सल्ला ऐकून एका 60 वर्षीय व्यक्तीने स्वतःलाच विषबाधा करून घेतली.

AI चा सल्ला, आणि त्याचा गंभीर परिणाम

‘Annals of Internal Medicine: Clinical Cases’ या नामांकित मेडिकल जर्नलमध्ये छापलेल्या केस स्टडीनुसार, एका व्यक्तीने अन्नात सोडियम क्लोराइड (म्हणजेच मीठ) हानिकारक असल्याचं वाचल्यानंतर, ChatGPT ला विचारलं – “माझ्या आहारातून मीठ काढून टाकायचं आहे. त्यासाठी काय पर्याय आहेत?”

ChatGPT ने तत्काळ उत्तर दिलं: Sodium Bromide. व्यक्तीनेही कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता, लगेच सोडियम ब्रोमाइड विकत घेतलं आणि तीन महिने ते रोजच्या जेवणात वापरायला सुरुवात केली.

तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये भरती

हळूहळू त्या व्यक्तीची तब्येत खालावत गेली. अधिक तहान लागणे, पाण्यावर संशय घेणे, आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर पहिल्याच २४ तासांत पॅरानॉइया (सगळे आपल्याविरुद्ध आहेत असं वाटणं) आणि हॅल्युसिनेशन्स (भास होणे) सुरू झाले.

एवढंच नव्हे, त्याने हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुढील तपासणीत समोर आलं की, त्याला Bromide Toxicity म्हणजेच ब्रोमाइड विषबाधा झाली होती.

हेही वाचा – शरीर गोठवा आणि भविष्यात पुन्हा जगा! मृत्यूनंतरचं जीवन देणारी विज्ञानाची वेडी कल्पना

ब्रोमाइड टॉक्सिसिटी म्हणजे काय?

डॉक्टरांच्या मते, ब्रोमाइड हा एक रासायनिक कंपाउंड आहे, जो काही औषधांमध्ये, समुद्राच्या पाण्यात, आणि सी-फूडमध्ये आढळतो.
जर शरीरात त्याचं प्रमाण जास्त झालं, तर ती स्थिती म्हणजेच ब्रोमिज़म (Bromism).

ब्रोमाइड विषबाधेची लक्षणं :

  • सतत थकवा आणि सुस्ती
  • भूक न लागणे
  • त्वचेवर रॅशेस
  • चिडचिडेपणा, स्मरणशक्ती कमी होणे
  • भास होणे (हॅल्युसिनेशन)
  • बोलण्यात अडचण
  • हालचालींमध्ये अस्थिरता
  • गंभीर स्थितीत, फिट्स आणि श्वास घेण्यास त्रास

निदान व उपचार कसे करतात?

जर डॉक्टरांना ब्रोमाइड विषबाधेचा संशय आला, तर ब्लड टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. कारण शरीरातून ब्रोमाइड काढण्यासाठी किडनी कार्यक्षम असणे गरजेचे आहे.

उपचारांमध्ये:

  • ब्रोमाइडयुक्त अन्न आणि औषधं बंद केली जातात
  • पुरेसे पाणी व द्रवपदार्थ दिले जातात
  • पोषणमूल्यांची भरपाई केली जाते
  • काही विशिष्ट औषधं दिली जातात

ChatGPT म्हणजे डॉक्टर नाही!

या घटनेवरून मिळणारी मोठी शिकवण म्हणजे – ChatGPT किंवा कोणताही AI प्लॅटफॉर्म हा डॉक्टर किंवा वैद्यकीय सल्लागाराचा पर्याय नाही. आहारात बदल करायचा असो किंवा काही लक्षणं दिसत असतील. डॉक्टरांचा सल्ला घ्या, ChatGPT चा नाही!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment