आईनेच विकलं सहा महिन्याचं बाळ, 95 हजारांत सौदा!

WhatsApp Group

Mother Sells Baby : उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक आणि माणुसकी हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका आईने अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला केवळ 95 हजार रुपयांना विकल्याचा आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्या बाळाची सुटका केली आहे.

ही घटना कौशांबी जिल्ह्यातील हराणा गावात घडली आहे. गावातील रहिवासी बृजेश कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत, आपली पत्नी ममता देवी हिने त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा दोन दिवसांपूर्वी 95 हजार रुपयांना विकल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही बाब समजताच बृजेश कुमार यांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याची पायरी चढली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनिता नावाच्या एका महिलेला हे बाळ विकण्यात आले होते, तर या संपूर्ण व्यवहारात एक दलाल (मध्यस्थ) सक्रिय असल्याचेही उघड झाले.

हेही वाचा – अवघ्या 30 सेकंदात क्रॅम्प्स गायब! ‘लोणच्याचा रस’ का मानला जातो गेम-चेंजर?

पोलिसांनी वेगाने हालचाली करत अवघ्या 24 तासांत त्या बाळाचा ठावठिकाणा शोधून काढला आणि सुरक्षितपणे त्याची सुटका केली. या प्रकरणात ममता देवी, दलाल आणि बाळ विकत घेणारी अनिता या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकार केवळ एक स्वतंत्र घटना आहे की मोठ्या बालतस्करी रॅकेटचा भाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संपर्क तपासले जात आहेत. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या बाळाला सुरक्षित देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, “पैशांसाठी आई एवढा क्रूर निर्णय कसा घेऊ शकते?” असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

ही घटना पुन्हा एकदा बालतस्करीसारख्या गंभीर सामाजिक समस्येचे भयावह वास्तव समोर आणते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment