Russian Plane Angara Missing : रशियामधील अंगारा एअरलाईन्सचं एक प्रवासी विमान अचानक रडारवरून गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमानात एकूण ५० प्रवासी, त्यात २ लहान मुले आणि ६ क्रू मेंबर्स सवार होते.
टिंडा विमानतळावर पोहोचण्याआधी संपर्क तुटला
रॉयटर्सच्या माहितीनुसार, अमूर भागाजवळ या AN-24 प्रकारच्या विमानाचा संपर्क हवाई नियंत्रणाशी तुटला. विमान टिंडा या ठिकाणी उतरण्याच्या काही वेळ आधीच रडारवरून गायब झालं. सध्या रशियन अधिकारी विमानाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत.
Russian plane with nearly 50 aboard, including 5 children, goes missing in country’s east https://t.co/WMFeBckEwl pic.twitter.com/H9NcJFHmnt
— New York Post (@nypost) July 24, 2025
याच एअरलाईन्सच्या विमानाला यापूर्वीही लागली होती आग!
हेच अंगारा एअरलाईन्सचं AN-24 विमान दोन महिन्यांपूर्वी रनवेवर उतरताना अचानक आगीनं भडकलेलं होतं. किरेन्स्कमध्ये लँडिंग दरम्यान विमानाचं नाक (नोज व्हील) तुटलं आणि त्यानंतर आग लागली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
जुलै 2023 मध्येही झाला होता अपघात
जुलै 2023 मध्ये AN-24 सीरिजचं आणखी एक विमान क्रॅश झालं होतं. त्या अपघातात ३७ प्रवासी होते.
हेही वाचा – 2006 मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरण: सुप्रीम कोर्टाचा आदेश! 12 आरोपींबाबतचा हायकोर्टाचा निर्णय थांबवला
अंगारा एअरलाईन्सबद्दल थोडक्यात
- स्थापना: वर्ष 2000
- मुख्य सेवा क्षेत्र: रशिया आणि सायबेरियामधील देशांतर्गत उड्डाणं
- फ्लीटमध्ये:
- ५ AN-148
- ७ AN-24
- ३ AN-26-100
- २ AN-2
- ११ MI-8 हेलिकॉप्टर
या एअरलाईन्सचं मुख्यालय इरकुत्स्क एअरपोर्टवर असून तिथे मोठ्या प्रमाणावर ग्राउंड स्टाफ, पार्किंग आणि देखभाल सेवा उपलब्ध आहेत. अंगारा नियमित देशांतर्गत उड्डाणांसह चार्टर सेवा देखील चालवते.
सध्या काय सुरू आहे?
रशियाचे हवाई नियंत्रण अधिकारी गायब झालेल्या विमानाचा पत्ता लावण्यासाठी शोध मोहिमेत गुंतले आहेत. प्रवाशांचे नातेवाईक चिंतेत असून, विमान सुरक्षित सापडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!