हरयाणात भाषेचं बंधन मोडलं! नाशिकच्या तरुणाला हरयाणवी काकांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

Haryanvi Man Hugs Maharashtrian Farmer Viral Video : एका भावुक करणाऱ्या व्हिडिओमध्ये हरयाणातील शेतात काम करत असलेल्या एका नाशिकच्या तरुणाशी हरयाणवी काका संवाद साधताना दिसत आहेत. जेव्हा काकांनी विचारलं, “कुठून आलास?” तर तरुण म्हणतो, “नाशिक, महाराष्ट्र.” पुढे काका म्हणतात, “हरयाणवीत बोल”, त्यावर तो उत्तर देतो, “मला भाषा येत नाही.”

ते ऐकून हरयाणवी काका त्याला हसत आलिंगन देतात आणि म्हणतात, “हा देश तुझा आहे. भाषा नको आली तरी चालेल, तू कुठेही काम कर…!” हा संवाद ऐकून उपस्थित सर्वजण भावूक होतात.

हेही वाचा – World Population Day 2025 : ‘जागतिक लोकसंख्या दिन’ का साजरा करतात? यंदाची थीम, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

या व्हिडिओला Instagram, YouTube Shorts आणि Facebook Reels वर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी कमेंट्समध्ये “हीच खरी भारताची ओळख आहे”, “भाषा नाही, भावना महत्वाच्या आहेत” असे म्हणत कौतुक केलं आहे.

या घटनेतून मिळणारा संदेश

भारतात भाषेचा अडसर नसून एकता आणि आपुलकी हाच खरा आधार आहे. प्रांतीय तेढ नव्हे, तर माणुसकी जपली पाहिजे. हा व्हिडिओ राष्ट्रीय एकात्मतेचं उदाहरण ठरत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment