“27 वर्ष साथ दिलेला सहकारी सोडून गेला…”, अभिषेक बच्चनची अशोक सावंत यांच्यासाठी भावनिक पोस्ट!

WhatsApp Group

Abhishek Bachchan On Makeup Artist Death : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने सोमवारी सकाळी आपल्या दीर्घकाळाच्या मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांच्या निधनाची बातमी सांगत एक हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. अभिषेकने उघड केलं की, मागील 27 वर्षांपासून त्याच्यासोबत काम करणारे अशोक सावंत रविवारी, 9 नोव्हेंबर रोजी या जगातून निघून गेले. या पोस्टमध्ये अभिषेकने त्यांच्या सोबतचे काही जुने फोटो शेअर करत त्यांना ‘कुटुंबाचा भाग’ म्हणून संबोधलं आहे.

अभिषेकने लिहिलं, “अशोक दादा आणि मी जवळपास 27 वर्षं एकत्र काम केलं. माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते माझं मेकअप करत आले. ते केवळ माझ्या टीमचा भाग नव्हते, ते माझ्या कुटुंबाचाच भाग होते. त्यांच्या मोठ्या भावाने दीपकजींनी जवळपास ५० वर्षं माझ्या वडिलांचं (अमिताभ बच्चन) मेकअप केलं आहे.”

अभिषेकने पुढे सांगितलं की, मागील काही वर्षांपासून अशोक सावंत आजारी होते, पण तरीही त्यांनी नेहमी आपल्या सहाय्यकांद्वारे त्याच्या मेकअपची काळजी घेतली. “मी शूटिंग करत असलो, की ते नक्की चौकशी करत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, त्यांनी नेहमी मिठी मारून स्वागत केलं, आणि त्यांच्या बॅगेत नेहमी चविष्ट चिवडा किंवा भाकरवडी असायची,” अभिषेकने लिहिलं.

हेही वाचा – लग्नाला 84 वर्ष झाली, 100 हून अधिक नातवंडासह जोडप्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

या पोस्टमध्ये अभिषेकने आणखी एक भावनिक आठवण सांगितली, “नव्या चित्रपटाच्या पहिल्या शॉटपूर्वी मी ज्यांच्या पायाला हात लावत त्यांच्या आशीर्वाद घेत असे, ते म्हणजे अशोक दादा. आता मात्र मला वर आकाशाकडे बघून त्यांचं आशीर्वाद घ्यावं लागेल.”

अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “तुमचं प्रेम, काळजी, प्रतिभा आणि हसू या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद. आता सेटवर जाऊन तुम्ही नसाल हे जाणवणं अत्यंत वेदनादायक आहे. परमेश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो. पुन्हा भेटू तेव्हा त्या नेहमीच्या मिठीसाठी उत्सुक आहे.”

या पोस्टनंतर अभिषेक बच्चनच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर अशोक सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि अभिषेकला सांत्वन दिलं.

अभिषेक बच्चनचे आगामी प्रोजेक्ट्स

अभिषेक बच्चन लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखसोबत दिसणार आहे. तसेच तो शाहरुख खानच्या ‘किंग’ या मल्टीस्टारर चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल, अशी चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment