Jay Dudhane Arrest : मराठी रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आणि MTV ‘स्प्लिट्सविला 13’मधून प्रसिद्ध झालेला टीव्ही स्टार जय दुधाणेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे 5 कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट फसवणुकीचा आरोप त्याच्या विरोधात करण्यात आला आहे.
अतिशय धक्कादायक बाब म्हणजे जय दुधाणे नुकताच विवाहबंधनात अडकला आणि पत्नी हर्षलासोबत हनीमूनसाठी विदेशात जात असतानाच पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.
Thane, Maharashtra: Jay Dudhane says, "I was about to go on my honeymoon. My brother, my wife, and my brother's wife—the four of us were going abroad. I didn't even know that an arrest warrant or an LOC (Lookout Circular) had been issued in my name. The police told me that I… https://t.co/shvAIQFQhN pic.twitter.com/I9HIgakYSL
— ANI (@ANI) January 4, 2026
जय दुधाणेने मात्र त्याच्या विरोधातील आरोप नाकारले असून, “संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे,” असा दावा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका निवृत्त अभियंत्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे म्हटले आहे की,
- दुधाणे आणि त्यांच्या कौटुंबिक नातलगांनी मिळून
- ठाण्यातील पाच कमर्शियल दुकाने विक्रीसाठी असल्याचे दाखवले
- पण ही दुकाने आधीच बँकेकडे गहाण होती
- तसेच खोटे डॉक्युमेंट्स आणि बोगस डिमांड ड्राफ्ट दाखवून
- तक्रारदाराकडून तब्बल ₹4.61 कोटींची फसवणूक झाली
त्यानंतर बँकेने जप्तीची नोटिस पाठवल्यानंतर संपूर्ण फसवणूक उघडकीस आली.
सीनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण माने यांनी पुष्टी केली की 4 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावरून जय दुधाणेला ताब्यात घेतले असून प्रकरणातील इतर आरोपींचीही चौकशी सुरू आहे.
जय दुधाणेने काय म्हटलं?
जय दुधाणेने सांगितले, “मी माझ्या हनीमूनसाठी बाहेर जात होतो. मला कोणतीही वॉरंट किंवा LOC जारी झाल्याची माहिती नव्हती. पोलिसांनी देशाबाहेर न जाण्याचे सांगितल्यामुळे मी पूर्ण सहकार्य करत आहे.”
डिसेंबर 2025 मध्ये जय दुधाणेने कंटेंट क्रिएटर हर्षलासोबत विवाह केला होता. MTV ‘स्प्लिट्सविला 13’ जिंकल्यानंतर तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि नंतर ‘बिग बॉस मराठी 3’मधूनही त्याने चांगली प्रसिद्धी मिळवली. जय दुधाणेने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू
पोलीस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवीन वळण मिळू शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा