कांताराच्या दैवाची थट्टा? व्हायरल व्हिडिओनंतर रणवीर सिंहने मागितली माफी, म्हणाला…

WhatsApp Group

Ranveer Singh Apology On Kantara Controversy : गोवा येथे पार पडलेल्या आयएफएफआय 2025 च्या समारोप सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंह एका कृतीमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या सुपरहिट चित्रपट ‘कांतारा: ए लिजंड – चॅप्टर 1’ मधील एका आयकॉनिक सीनची नक्कल रणवीरने स्टेजवर केली. त्यात त्यांनी ‘दैव’चा उल्लेख “स्त्री भूत” असा करताच संतापाचा भडका उडाला आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

वादानंतर रणवीर सिंहची अधिकृत माफी

वाद वाढताच रणवीरने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “माझा उद्देश ऋषभच्या अविश्वसनीय अभिनयाचं कौतुक करण्याचा होता. त्या सीनची ताकद जाणून अभिनेता म्हणून मी त्यांच्या कामाचं मनापासून प्रशंसन करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा मी अत्यंत आदर करतो. माझ्या शब्दांनी किंवा कृतींनी कुणाची भावना दुखावली असेल तर मी मन:पूर्वक माफी मागतो.” रणवीरचे हे निवेदन सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले.

रणवीरने स्टेजवर नेमकं काय म्हटलं?

आयएफएफआयच्या मंचावर ऋषभ शेट्टी प्रेक्षकांत बसलेले असताना रणवीर म्हणाला, “मी कांतारा चॅप्टर 1 थिएटरमध्ये पाहिला… ऋषभ, तुझं काम अफाट होतं, खास करून जेव्हा ‘स्त्री भूत (चामुंडी दैव)’ तुझ्यात प्रवेश करते तो सीन अविश्वसनीय होता.” यानंतर रणवीरने त्या दृश्याची नक्कल सादर केली. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होऊ लागला.

चाहत्यांचा संताप  

रणवीरने ‘दैव’ला ‘भूत’ म्हटल्याने अनेक चाहते भडकले. ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) वर एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्हाला देव आणि भूत यातला फरकही कळत नाही. चामुंडी माता ही देवी आहे, भूत नाही. तुम्ही मोठ्या मंचावर तिची थट्टा केली.”

दुसऱ्याने लिहिले, “#RanveerSingh literally called Chavundi Mata a ghost… Isn’t this blasphemy?” वादाचा विस्तार इतका वाढला की रणवीरला माफी मागावी लागली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment