Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या दोघांनी 22 फेब्रुवारी रोजी समाजमाध्यमांवरून त्यांच्या विवाहाची घोषणा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.
उदयपूरमध्ये शाही आगमन
लग्नापूर्वीचे सोहळे सुरू करण्यासाठी ही जोडी राजस्थानमधील उदयपूर येथे दाखल झाली आहे. विमानतळावर आगमनावेळी दोघेही आनंदी मुद्रेत दिसले.
रश्मिका औपचारिक पोशाखात तर विजय आकर्षक काळ्या जाकेटमध्ये चाहत्यांना हात हलवत विवाहस्थळी रवाना झाला.
‘VIROSH’ विवाहाची घोषणा
दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक भावनिक संदेश प्रसिद्ध केला. चाहत्यांनी दिलेल्या ‘VIROSH’ या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या एकत्र येण्याला ‘The Wedding of VIROSH’ असे नाव दिले आहे.
हेही वाचा – टी-20 विश्वचषकात अभिषेक शर्मा अपयशी का? सुनील गावसकरांनी उघड केलं मोठं कारण!
या संदेशातून त्यांनी चाहत्यांचे आभार मानत, “तुमच्या प्रेमामुळे आम्ही एक आहोत,” असे नमूद केले.
विवाहाची तारीख आणि स्थळ
अधिकृत पोस्टमध्ये विवाहतारीख नमूद नसली तरी, समोर आलेल्या निमंत्रणपत्रिकेनुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथील एका भव्य राजवाड्यात हा शाही विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या विवाह सोहळ्यास फक्त कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे चित्रपटसृष्टीतील मित्रांसाठी भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला
रश्मिका आणि विजय यांची जोडी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होती. मात्र दोघांनीही याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. आता त्यांनी स्वतःच विवाहाची घोषणा केल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
‘विरोश’चा हा विवाह सोहळा 2026 मधील सर्वात चर्चित सेलिब्रिटी विवाहांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा