Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित जोडींपैकी एक असलेले रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरात आहे. गेल्या महिन्यात हैदराबाद येथे एका खासगी सोहळ्यात या दोघांचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं जातं. जरी दोघांनीही अधिकृतरीत्या याची घोषणा केलेली नाही, तरी अलीकडे दोघांच्या हातात दिसलेल्या एंगेजमेंट रिंग्सने सर्व शंका दूर केल्या आहेत.
विजयच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचं लग्न फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडणार असून, या वर्षातील सर्वात भव्य लग्न सोहळा ठरण्याची शक्यता आहे.
उदयपूरमध्ये राजेशाही विवाह सोहळा
‘द सिने गॉसिपीज’ या सोशल मीडिया हँडलने दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय यांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानातील उदयपूर येथे एका अप्रतिम राजवाड्यात होणार आहे. उदयपूर हे बॉलिवूड आणि साऊथ स्टार्ससाठी पसंतीचं डेस्टिनेशन वेडिंग ठिकाण मानलं जातं.
हेही वाचा – VIDEO : ‘महाभारत’ युद्धाच्या पहिल्या दिवसाचं LIVE रिपोर्टिंग..! एखाद्या चित्रपटापेक्षाही जबरदस्त; पाहाच!
याच राज्यात यापूर्वी प्रियंका चोप्रा–निक जोनस, सिद्धार्थ मल्होत्रा–कियारा अडवाणी, कतरिना कैफ–विकी कौशल यांसारख्या स्टार जोड्यांनी आपलं लग्न केलं होतं. त्यामुळे रश्मिका–विजय यांच्या लग्नाने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा लग्नसोहळ्यांचा माहोल रंगणार आहे.
विकिपीडियावर ‘एंगेज्ड’ स्टेटसन
जरी रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अजूनही मौन बाळगलं असलं, तरी रश्मिकाच्या विकिपीडियावर विजय देवरकोंडा यांचं नाव “Engaged Partner” म्हणून अपडेट झालं आहे. हे अपडेट दिसताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आनंदाचा आणि कुतूहलाचा पूर आला.
अहवालांनुसार, या दोघांनी हैदराबादमधील विजयच्या घरात साखरपुडा केला असून, रश्मिका अनेकदा विजयच्या कुटुंबासोबत दिसली आहे.
रश्मिका–विजयची प्रेमकहाणी
या दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात 2018 मधील ‘गीता गोविंदम’ या चित्रपटापासून झाली. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या ‘डिअर कॉम्रेड’ मध्ये त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली. त्याच काळापासून दोघे एकत्र सुट्ट्यांवर, कार्यक्रमांमध्ये आणि पुरस्कार समारंभात दिसू लागले.
2024 मध्ये दोघांनीही मुलाखतीत सांगितलं होतं की, “आम्ही सिंगल नाही,” मात्र त्यांनी आपल्या पार्टनरचं नाव उघड केलं नव्हतं. अलीकडेच दोघे विमानतळावर एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या नात्याविषयीचे अंदाज आणखी बळावले आहेत.
रश्मिका अलीकडेच ‘थम्मा’ या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत झळकली. तर विजयचा शेवटचा चित्रपट ‘किंग्डम’ प्रदर्शित झाला होता. सध्या रश्मिका तिच्या आगामी तेलुगू चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा