शिल्पा शेट्टीला तगडा धक्का, बंद करावे लागले बांद्र्यातील लग्झरी रेस्टॉरंट!

WhatsApp Group

Shilpa Shetty Bastian Restaurant Bandra : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मुंबईच्या बांद्रा येथील लोकप्रिय रेस्टॉरंट ‘बास्टियन’ आता बंद होणार आहे. शिल्पाने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे फॉलोअर्सना ही बातमी दिली. पोस्टमध्ये शिल्पाने सांगितले की गुरुवारी हा रेस्टॉरंटचा शेवटचा दिवस असेल.

शिल्पाची इमोशनल पोस्ट

शिल्पा शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “गुरुवारी एक युगाचा शेवट होत आहे कारण आम्ही मुंबईच्या आयकॉनिक ठिकाणांपैकी एक ‘बास्टियन, बांद्रा ला अंतिम निरोप देणार आहोत. या ठिकाणी आम्हाला असंख्य आठवणी, विसरता येणार नाही अशा रात्री, आणि शहराच्या नाईटलाइफला आकार देणारे क्षण मिळाले. आता हा शेवटचा टप्पा आहे.”

शिल्पा सांगते की त्या लेजेंडरी ठिकाणी आदर व्यक्त करण्यासाठी ती आणि तिचे सहाय्यक एक खास इव्हेंट आयोजित करत आहेत. या कार्यक्रमात आठवणींना उजाळा देण्यात येईल आणि सेलिब्रेशन केले जाईल.

हेही वाचा – भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला लुटल्याचा आरोप; 800 रुपयेही चोरले, विक्रेत्याने दाखल केली तक्रार!

60 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

गेल्या काही वर्षांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन अनेक उतार-चढावांनी भरलेलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यवसायिकाने इकोनॉमिक ऑफेन्स विंग मध्ये या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली.

या तक्रारीत दावा करण्यात आला की 2015 ते 2023 दरम्यान, राज आणि शिल्पा यांच्या बंद झालेल्या कंपनी Best Deal Private Limited मध्ये दीपक कोठारी नावाच्या व्यक्तीने पैसे गुंतवले होते. परंतु, आरोप आहे की राज आणि शिल्पा यांनी हे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले.

शिल्पाच्या वकिलांनी या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे आणि सांगितले की सर्व आवश्यक कागदपत्रे तपासणाऱ्या एजन्सीला दिली आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment