FIR against SS Rajamouli : हैदराबादमध्ये झालेल्या ‘वाराणसी’ चित्रपटाच्या ग्लोबट्रॉटर इव्हेंटदरम्यान दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. 15 नोव्हेंबर रोजी रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित या कार्यक्रमात तांत्रिक बिघाडांमुळे सुरुवातीपासूनच विलंब होत होता. त्या वातावरणात राजामौली भावनिक झाले आणि संतापाच्या भरात त्यांनी हनुमानांवर अप्रत्यक्ष भाष्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. आता या प्रकरणी राष्ट्रीय वानरसेना संस्थेने राजामौली यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
राजामौलींचे विवादित वक्तव्य नक्की काय?
‘वाराणसी’ चित्रपटाचा ट्रेलर या इव्हेंटमध्ये रिलीज होणार होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. या परिस्थितीमुळे चिडलेल्या राजामौलींनी मंचावर बोलताना म्हटले, “ही माझ्यासाठी भावनिक वेळ आहे. मी देवावर विश्वास ठेवत नाही. पण माझे वडील म्हणायचे, ‘हनुमान सर्व सांभाळतील’. हा काय सांभाळण्याचा प्रकार आहे? विचार केला तरी मला राग येतो. माझ्या वडिलांनी हनुमानाच्या कृपेवर अवलंबून राहायला सांगितलं तेव्हा मला खूप संताप आला होता.”
हे वक्तव्य समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बोलण्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना, राष्ट्रीय वानरसेनेच्या सदस्यांनी राजामौलींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विधानामुळे भगवान हनुमानांच्या श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या गेल्या, असा त्यांचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राजामौली यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑनलाइन ट्रोलिंग सुरू असतानाच राजामौली यांचा 2011 मधला एक जुने ट्वीट पुन्हा व्हायरल झाले. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की त्यांना Lord Ram विशेष आवडत नाहीत आणि त्यांना Lord Krishna अधिक प्रिय आहेत.
“But I never liked lord ram. Lord Krishna is my favourite of all the avatars,” असे त्यांनी 2011 मध्ये लिहिले होते. या जुन्या ट्वीटने लोकांचा संताप आणखी वाढल्याचे दिसत आहे.
‘वाराणसी’ चित्रपटाबद्दल – भव्य स्टारकास्ट, 2027 मध्ये रिलीज
राजामौली सध्या ‘वाराणसी’ या महत्वाकांक्षी चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात प्रियंका चोप्रा जोनास, महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. चित्रपट 2027 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे आणि त्याचे शूटिंग मोठ्या प्रमाणावर विविध लोकेशन्सवर होणार आहे.
राजामौली हे ‘बाहुबली’ आणि ‘RRR’ सारख्या जागतिक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक असल्याने त्यांचे प्रत्येक वक्तव्य चर्चेत येते. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झाल्यामुळे हे प्रकरण आता अधिक संवेदनशील झाले असून, चित्रपटाच्या प्रमोशनवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!