Rs 350 Crore Movie Business Before Release : भारतातील बॉक्स ऑफिसवर एखाद्या चित्रपटाचे यश हे त्याच्या कमाईवर ठरते. पण जर एखाद्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 350 कोटी रुपयांची कमाई केली, तर? अविश्वसनीय वाटत असले तरी हे खरे आहे! ‘दृश्यम 3’ या मल्याळम थ्रिलर फ्रेंचाइजीचा अंतिम अध्याय रिलीजपूर्वीच प्रचंड कमाई करत आहे आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरा दिला आहे.
’लोका: चॅप्टर 1’लाही मागे टाकलं!
दक्षिणेतील सर्वाधिक यशस्वी फ्रेंचाइजपैकी एक असलेली दृश्यम मालिका आपल्या दमदार कथाकथनासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण ‘दृश्यम 3’ ने तर चक्क लोका: चॅप्टर 1 सारख्या मोठ्या प्रोजेक्टलाही मागे टाकत अविश्वसनीय कामगिरी केली आहे.
350 कोटींचा बिझनेस – इंडस्ट्रीमध्ये खळबळ!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘दृश्यम 3’ ने आधीच 350 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. हा बिझनेस थिएट्रिकल, ओव्हरसीज, डिजिटल राइट्स आणि हिंदी रिमेक राइट्स विक्रीतून झाला आहे.
It's a wrap #Drishyam3 👨👩👧👧@Mohanlal @jeethu4ever #MeenaSagar #Estheranil #AnsibaHassan @antonypbvr @aashirvadcine pic.twitter.com/SQgl0xDK1K
— Drishyam 3 (@drishyam3movie) December 2, 2025
प्रोड्यूसर एम. रंजीत यांनी उघड केले की, पॅनोरमा स्टुडिओज (कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक) यांनी हिंदी रिमेकसह सर्व प्रमुख राइट्स खरेदी केले आहेत. ही डील मल्याळम फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील सर्वात मोठी प्री-रिलीज डील ठरली आहे.
3 कोटींपासून 350 कोटींपर्यंतचा प्रवास
- दृश्यम 1 (2013) – फक्त 3 कोटी खर्च, पण 100 कोटींहून अधिक कमाई
- दृश्यम 2 – महामारी असूनही 350 कोटींपर्यंतचा प्रवास
- दृश्यम 3 – एकही फ्रेम शूट नसताना 350 कोटींचे रेकॉर्ड
हा प्रवास थेट “कल्चरल सिंबल” बनला आहे.
हिंदी वर्जनने तर 1,800 कोटींचा इतिहास रचला
दिवंगत निशिकांत कामत दिग्दर्शित आणि अजय देवगण श्रीया सरन अभिनीत हिंदी अडॅप्टेशनने तब्बल 1,800 कोटी रुपये कमावत राष्ट्रीय पातळीवर दणका दिला. म्हणूनच ‘दृश्यम 3’ बद्दल देशभर प्रचंड क्रेझ आहे.
मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ या दोघांनीही ‘दृश्यम 3’ साठी पुनरागमन केले आहे. संपूर्ण कथा सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे. आणि आता प्रश्न असा दृश्यम 3 ची कथा त्या उंचीला पोहोचेल का, जी अपेक्षा आधीच 350 कोटींनी तयार केली आहे? याचे उत्तर फक्त मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांच्या स्क्रिप्टमध्येच दडलं आहे!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा