लोक कपड्यांशिवाय साजरं करणार नवीन वर्ष! ‘न्यूड न्यू इयर पार्टी’ची जबरदस्त चर्चा!

WhatsApp Group

Nude New Year Party : डिसेंबरचा शेवट आणि नवीन वर्षाचं स्वागत… जगभरात उत्साहाचं वातावरण असतंच. पण ब्रिटनमध्ये यंदा एका अनोख्या न्यू इयर पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. Naturist म्हणजेच प्रकृतिवादी समुदायाशी जोडलेले लोक ‘नो-क्लोथ्स थीम’मध्ये नवीन वर्ष स्वागत करणार असल्याने हा विषय सध्या सोशल मीडियावरही गाजतो आहे.

या समुदायातील लोकांना पूर्णपणे नैसर्गिक आणि स्वच्छंद राहणं हीच जीवनशैली वाटते. त्यामुळे पारंपरिक पार्ट्यांपेक्षा वेगळी अशी ही ‘न्यूड न्यू इयर पार्टी’ चर्चेत आली आहे.

बर्मिंघममधील छोटं हॉटेल, पण मोठी चर्चा

डेली स्टारच्या अहवालानुसार, बर्मिंघममधील Clover Spa and Hotel येथे या पार्टचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त सात खोल्यांचं हे लहानसं हॉटेल असलं तरी डिसेंबरपासून इथे Naturists साठी खास इव्हेंट्स चालूच आहेत.

ख्रिसमसदरम्यान कपल्स इव्हेंट, मसाज सेशन्स आणि डिनर कार्यक्रम झाले. आता 31 डिसेंबरच्या रात्री ‘न्यूड न्यू इयर्स ईव पार्टी’ होणार आहे.

हेही वाचा – फक्त 7 धावांत 8 विकेट्स, टी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड!

DJ, Drinks… पण कडक नियम

या पार्टीला सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होईल.
पहिल्यांदा पाहुण्यांना स्पा आणि रिलॅक्स सेशन मिळेल. त्यानंतर खाणं-पिणं आणि रात्री 7 ते 1 वाजेपर्यंत DJ Liam च्या संगीतावर डान्स असा कार्यक्रम राहणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे ही पार्टी पूर्णपणे सोशल, सुरक्षित आणि नियमबद्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना परवानगी नाही. वातावरण मित्रत्वाचं आणि सभ्य ठेवलं जातं.

आधी बुकिंग आवश्यक

हॉटेलनुसार, फक्त 18+ वयोगटासाठीच प्रवेश आहे. स्पा डे बुकिंगसोबत 15 पाउंडचा पार्टी चार्ज जोडला जातो. हॉटेलचे मालक टिम हिग्स सांगतात, “लोक इथे संगीत, गप्पा आणि मित्र बनवण्यासाठी येतात. ही फक्त लाइफस्टाइलची निवड आहे. सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नाही.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment