VIDEO : मुख्याध्यापकाने स्वत:च्या खिशातले 5 लाख घालून विद्यार्थ्यांना बसवलं विमानात! संपूर्ण गाव भावूक

WhatsApp Group

Village Students Flight Experience : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील बहादुरबांदी या छोट्याशा गावातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातला अविस्मरणीय दिवस अवतरला. आकाशात उडणारं विमान म्हणजे फक्त स्वप्न… असं समजणाऱ्या या मुलांना पहिल्यांदाच खऱ्या विमानात बसण्याची संधी मिळाली आणि हा चमत्कार घडवून आणला त्यांच्या मुख्याध्यापकांनी!

सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक बीरप्पा अंदगी यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल ₹5 लाख रुपये खर्च करून 24 विद्यार्थ्यांना विमानप्रवास घडवून आणला. अनेक वर्षांपासून मनात रेंगाळत असलेलं विमानाचं स्वप्न त्या मुलांसाठी प्रत्यक्षात उतरलं आणि या क्षणाची साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण गाव जमलं.

“विद्यार्थी देवासारखे त्यांचा आनंद म्हणजे माझं भाग्य”

क्लास 5 ते 8 मधील प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांची मेरिट चाचणीवर निवड करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी जिंदाल विमानतळावरून विशेष विमानाने बंगळुरूला रवाना झाले. मुख्याध्यापक म्हणाले, “मी पदभार स्वीकारला तेव्हाच ठरवलं होतं की या मुलांना विमानप्रवास घडवणार. विद्यार्थी म्हणजे देव. उद्या यांच्यातला एखादा मोठा शास्त्रज्ञ, अधिकारी किंवा तज्ज्ञ झाला… तर हाच आनंद सर्वांत मोठा पुरस्कार आहे.”

हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय Pain Killer वर बंदी, 100 mg डोसवर सरकारचा थेट बॅन, जाणून घ्या कारण!

त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांच्या जिवलग मित्राने आर्थिक मदत दिली. ₹3.5 लाख विमानप्रवासासाठी तर उर्वरित रक्कम प्रवास, भोजन, पर्यटन स्थळांची तिकिटे आणि परतीच्या रेल्वे प्रवासासाठी खर्च झाली.

बीरप्पा अंदगी यांच्यावर आधीपासून सुमारे ₹50 लाखांचे वैयक्तिक कर्ज आहे. तरीही ते म्हणतात, “मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की सगळं विसरतो. हेच खऱ्या अर्थाने समाधान आहे.” विद्यार्थी रविवारीपर्यंत बंगळुरूमध्ये राहून विविध शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेट देणार आहेत.

गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी इतकी मोठी जबाबदारी स्वतःवर घेणाऱ्या या शिक्षकांचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या त्यागाचं हे अनोखं उदाहरण सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. ही कथा केवळ विमानप्रवासाची नाही…तर स्वप्नांना पंख देणाऱ्या एका खऱ्या ‘गुरुजींच्या’ हृदयस्पर्शी प्रवासाची आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment