मृत समजून मुलाचा अंत्यसंस्कार झाला आणि तीन दिवसांनी तोच मुलगा घरात परत जिवंत आला!

WhatsApp Group

Man Alive After Funeral : छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातून एक अविश्वसनीय आणि थरारक घटना समोर आली आहे. मृत मानलेल्या एका तरुणाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन दिवसांनी तो जिवंत घरी परतला! या घटनेने फक्त गावच नव्हे, तर संपूर्ण पोलीस विभागाला हादरवून सोडलं आहे.

अंत्यसंस्कार आणि नंतर जिवंत परतलेला मुलगा!

सूरजपूरच्या मानपूर रिंगरोडलगत एका शेतातील विहिरीत काही दिवसांपूर्वी एक अज्ञात मृतदेह सापडला होता. त्याच वेळी चंद्रपूर गावातील पुरुषोत्तम नावाचा युवक हरवलेला असल्याने, कुटुंबीयांनी त्या मृतदेहाची ओळख पुरुषोत्तम म्हणून केली.

कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी तो मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. दुःखाच्या वातावरणात घरच्यांनी अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली आणि मृतदेह दफन करून सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. गावात शोककळा पसरली होती.

मात्र, तीन दिवसांनंतर तेच शोकाचे वातावरण अचानक आनंदात बदलले, कारण मृत समजलेला पुरुषोत्तम स्वतः आपल्या घराच्या दारात उभा होता! त्याला पाहताच कुटुंबीय रडू लागले, शेजारी जमले आणि गावात एकच गोंधळ उडाला. सगळ्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

पोलीसही चकित, मग तो मृतदेह कोणाचा?

या घटनेनंतर आता पोलिसांसमोर सर्वात मोठं कोडं उभं राहिलं आहे. “ज्याचा अंत्यसंस्कार पुरुषोत्तम म्हणून करण्यात आला, तो मृतदेह मग नेमका कोणाचा?” पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, मृत व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला होता. पोलिसांनी डीएनए नमुने, कपडे, बोटांचे ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवले आहेत. मृतदेहाची खरी ओळख पटवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही घेतले गेले आहेत.

हेही वाचा – मिझोरामच्या महिलेची अविश्वसनीय कहाणी, दोन किडनी ट्रान्सप्लांटनंतरही दोन बाळांना जन्म!

एका बाजूला पुरुषोत्तमच्या कुटुंबाला त्यांचा मुलगा परत मिळाल्याचा आनंद आहे, पण दुसऱ्या बाजूला ज्याचा खरा मृतदेह दफन करण्यात आला, त्याच्या कुटुंबाला अजूनही काहीच माहिती नाही.

या घटनेमुळे संपूर्ण सूरजपूर जिल्ह्यात खळबळ माजली असून, पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला आहे. आता सर्वांचे लक्ष या गूढ रहस्याच्या उकलाकडे लागले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment