

Vehicle Ownership Transfer Process : देशात सेकंड हँड गाड्या, मग ती कार असो की बाईक, त्यांचा व्यवसाय खूप वाढत आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये अधिक फीचर्स असलेली कार किंवा बाईक घ्यायची आहे, ते सेकंड हँड गाड्यांच्या मार्केटकडे वळतात. पण सेकंड हँड गाडी खरेदी केल्यानंतर, सर्वात मोठा त्रास होतो तो तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घेणे, यासाठी आरटीओ एजंट तुमच्याकडून भरमसाठ शुल्क आकारतात.
ही एक त्रासदायक प्रक्रिया असेल असते, शिवाय तुमचा बराच वेळ वाया जातो. पण हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काही मिनिटांत करू शकता, तुम्हाला ना RTO ला भेट द्यावी लागेल, ना तुम्हाला एजंटची फी भरावी लागणार. हे आता पूर्णपणे शक्य आहे. तुमच्या नावावर कार किंवा बाईक ऑनलाइन कशी सहजपणे ट्रान्सफर करू शकता ते जाणून घ्या…
हेही वाचा – Horoscope Today: वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण, मीनसह ‘या’ ४ राशींना मिळेल प्रगती आणि लाभ
- कार किंवा बाईक ट्रान्सफर करण्यासाठी https://parivahan.gov.in/parivahan/ वर जावे लागेल.
- येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- यानंतर, तुमचे वाहन कोणत्या आरटीओ अंतर्गत येते ते तुम्हाला निवडावे लागेल.
- येथे वाहन संबंधित सेवांमध्ये, तुम्हाला ट्रान्सफर ऑफ ओनरशिपचा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर फॉर्म 29 आणि फॉर्म 30 तुमच्या समोर येतील.
- हे दोन्ही फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर, तुमच्याकडे वाहन हस्तांतरण शुल्क भरण्याचा पर्याय असेल.
- वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे शुल्क वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, कारची आरसी दिल्लीत हस्तांतरित करण्यासाठी, 500 रुपये जमा करावे लागतील.
- हे शुल्क तुम्ही ऑनलाइन सहज जमा करू शकता.
- यानंतर, तुम्हाला पावती आणि दोन्ही फॉर्मची प्रिंट संबंधित आरटीओला मेल करावी लागेल.
RC कधी येईल?
आरटीओला सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर पडताळणीला काही दिवस लागतात. याला 7 ते 10 दिवस लागतात. यानंतर, RTO तुमच्या नावाने हस्तांतरित केलेली नवीन RC तुमच्या पत्त्यावर पाठवते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!