शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा! भारतात बनवलेल्या औषधामुळे गेला जीव?

WhatsApp Group

Shane Warne’s Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे मार्च २०२२ मध्ये थायलंडमध्ये निधन झाले. त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शेन वॉर्नच्या मृत्यूच्या चौकशीत एक नवीन वळण आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, थायलंडमधील त्याच्या व्हिलामधून एक महत्त्वाची वस्तू काढून टाकण्यात आली आहे. अहवालानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कामग्रा नावाच्या औषधाची बाटली काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले.

या धक्कादायक खुलाशामुळे प्रकरण अधिक गूढ बनले आहे, कारण अधिकृत अहवालात वॉर्नच्या मृत्यूचे कारण फक्त हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर डेली मेलशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाग्राच्या बाटल्या काढून टाकण्याचे आदेश मिळाले आहेत. हे प्रकरण लपवण्यात ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांचीही भूमिका असू शकते, असेही त्यांनी संकेत दिले. त्यांच्या मते, शेन वॉर्नसारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूकडे अशा प्रकारे पाहिले जावे अशी उच्च अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती, म्हणून अधिकृत अहवालात फक्त हृदयविकाराचा उल्लेख करण्यात आला होता आणि इतर कोणत्याही संभाव्य कारणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गुन्ह्याच्या ठिकाणी उलट्या आणि रक्ताचे निशान देखील आढळले होते, परंतु अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कामग्राची बाटली काढण्यात आली. ते म्हणाले की, ही एक संवेदनशील बाब आहे ज्यामध्ये अनेक शक्तिशाली लोक सामील असू शकतात, ज्यांना त्याचे सत्य सार्वजनिक करायचे नाही.वॉर्नने हे औषध किती प्रमाणात घेतले होते हे स्पष्ट झालेले नाही. ही माहिती समोर आल्यानंतर, या प्रकरणाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि तपास प्रक्रियेबाबत नवीन चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – मलायका अरोरा आणि कुमार संगकाराच्या अफेअरच्या चर्चा!

हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारांसाठी वापरले जाते आणि त्यात सिल्डेनाफिल सायट्रेट असते, जो व्हायग्रामध्ये आढळणारा मुख्य घटक आहे. लैंगिकता वाढवण्यासाठी वापरले जाणारे हे औषध भारतात बनवले जाते. युरोपियन युनियनसह अनेक देशांमध्ये यावर बंदी आहे. त्याच्या वापरामुळे हृदयाचे ठोकेही वाढतात. शेन वॉर्नने नेमकी किती मात्रा वापरली हे त्याच्या अहवालातून कळू शकले नाही.

थायलंडमधील कोह समुई येथे सुट्टी घालवत असताना ५२ वर्षीय शेन वॉर्नचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सुरत थानी रुग्णालयाने केलेल्या शवविच्छेदनात त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आणि त्यात कोणतीही असामान्यता आढळली नाही. आता समोर आलेल्या या नवीन माहितीमुळे संपूर्ण घटना अधिक गुंतागुंतीची झाली आहे, ज्यामुळे या प्रकरणात काही महत्त्वाचे तथ्य जाणूनबुजून लपवण्यात आले होते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment