Car Price Hike : कार खरेदीदारांना मोठा धक्का..! ‘या’ १० कंपन्यांच्या गाड्या आजपासून महागल्या

WhatsApp Group

Car Price Hike : नवीन वर्षाची सुरुवात कार खरेदीदारांसाठी चांगली राहिलेली नाही. भारतातील आघाडीच्या कार कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्सपासून ऑडी आणि ह्युंदाईपर्यंत अनेक कंपन्या जानेवारी २०२३ पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत. कंपन्यांचा दावा आहे की वाढत्या इनपुट खर्चाची भरपाई करण्यासाठी आणि उत्सर्जनाच्या कठोर नियमांचे पालन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. तुम्हीही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर खालील माहिती वाचा…

मारुती सुझुकी

मारुती सुझुकी इंडियाने आधीच सांगितले होते की जानेवारी २०२३ पासून किमती वाढणार आहेत. सध्या, मारुती सुझुकीच्या अल्टो, अल्टो K10, इग्निस, वॅगनआर, सेलेरियो, एस-प्रेसो, स्विफ्ट, इको, डिझायर, ब्रेझा, सियाझ, एर्टिगा, XL6 आणि ग्रँड विटारा ही सर्वाधिक विक्री होणारी वाहने आहेत.

टाटा मोटर्स

मारुती सुझुकीसोबतच टाटा मोटर्सनेही आपल्या संपूर्ण श्रेणीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी २ जानेवारी २०२३ पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. त्यांच्या किमतीत २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा – 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! १ जानेवारीपासून ‘इतका’ वाढणार DA

होंडा कार

Honda Cars देखील जानेवारी २०२३ पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवत आहे. नवीन वर्षात कंपनीच्या संपूर्ण श्रेणीच्या किमती ३०,००० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. ही दरवाढ मॉडेल्सवर वेगवेगळी असेल.

ह्युंदाई इंडिया

मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. ह्युंदाईने जानेवारीपासून आपल्या कारच्या किमती वाढवत असल्याचे म्हटले आहे. नवीन किमती जानेवारी २०२३ पासून लागू झाल्या आहेत.

किया इंडिया कार

जानेवारीपासून कियाकार ५०,००० रुपयांनी महागल्या आहेत. भारतात, कंपनी सेलटोस, सोनेट आणि केरेन्स सारख्या लोकप्रिय कार विकते.

हेही वाचा – Saving Scheme : नवीन वर्षातील सर्वोत्तम योजना..! टॅक्सही वाचेल आणि धमाकेदार सेविंगही होईल

ऑडी

नवीन वर्षात ऑडीची आलिशान वाहने खरेदी करणे महाग झाले आहे. जर्मन ऑटोमेकरने म्हटले आहे की ते आपल्या संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किंमती वाढवत आहेत. ऑडी इंडियाने सांगितले की, किमती १.७ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

मर्सिडीज-बेंझ

ऑडीसोबतच मर्सिडीज बेंझनेही दरवाढ जाहीर केली आहे. १ जानेवारी २०२३ पासून त्याच्या कारच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

जीप इंडिया

जीपनेही आपल्या मॉडेल रेंजमध्ये दरवाढीची घोषणा केली आहे. कंपास, रँग्लर, मेरिडियनसह नव्याने लॉन्च झालेल्या ग्रँड चेरोकी २ ते ४ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.

रेनो

रेनॉल्ट इंडियाने इनपुट कॉस्टमध्ये सतत होणाऱ्या वाढीचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी किमती वाढवल्या आहेत. मात्र, कंपनीने त्यांच्या किमती किती वाढल्या याचा खुलासा केलेला नाही.

एमजी मोटर

MG Motor India ने देखील मॉडेल आणि प्रकारानुसार किंमती २-३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment