China Gravity Centrifuge : चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारी झेप घेतली आहे. झेजियांग विद्यापीठात (Zhejiang University) जगातील सर्वात शक्तिशाली ग्रॅव्हिटी सेंट्रिफ्यूज बसवण्याचे काम सुरू झाले असून या मशीनचं नाव आहे — CHIEF1900. हे मशीन इतकं शक्तिशाली आहे की ते पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणापेक्षा तब्बल 300 पट जास्त ताण (300G) निर्माण करू शकतं!
काय आहे हे ग्रॅव्हिटी सेंट्रिफ्यूज?
डॅम, रेल्वे लाईन, पाणबुडी, स्पेस कॅप्सूल यांसारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर प्रचंड ताण पडतो. हा ताण सहन करण्याची त्यांची क्षमता तपासण्यासाठी प्रत्यक्ष मॉडेल नष्ट करण्याचा धोका पत्करण्याऐवजी या मशीनमध्ये त्यांची लहान मॉडेल्स फिरवून चाचणी घेतली जाते.
China launched the world's largest centrifuge in terms of capacity, capable of generating 300 times Earth's gravity for a load up to 20 tonnes. pic.twitter.com/js79LLe83H
— China Xinhua Sci-Tech (@XHscitech) September 29, 2025
उदाहरणार्थ जर 300 मीटर उंच धरणाची ताकद तपासायची असेल, तर वैज्ञानिक फक्त 3 मीटरचं मॉडेल तयार करतात आणि ते 100G वेगाने फिरवतात. यामुळे प्रत्यक्ष धरणावर पडणारा ताण तसाच निर्माण होतो.
हेही वाचा – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर 111 रुपयांनी महाग, हॉटेल-ढाब्यांच्या खर्चात वाढ!
जगातलं सर्वात सामर्थ्यशाली मशीन
ही सेंट्रिफ्यूज सुविधा चीनमधील हंगझोऊ (Hangzhou) शहरात आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठी सेंट्रिफ्यूज इथेच होती, आता CHIEF1900 तिच्याही पुढे गेली आहे.
🔹 20 टन वजनदार मॉडेल फिरवू शकते
🔹 100G ते 300G इतका ताण निर्माण करू शकते
🔹 अमेरिकेतील तत्सम मशीनपेक्षा 40% जास्त शक्तिशाली आहे
सामान्य घरगुती वॉशिंग मशीन फक्त 2G ताण निर्माण करतं — म्हणजेच या मशीनची ताकद किती भीषण असेल याची कल्पना येते!
काही शतकांत होणारे बदल, आता काही दिवसांत!
या मशीनमुळे
✔ मातीमध्ये प्रदूषण किती वेगाने पसरतं
✔ मोठ्या बांधकामांवर ताण किती बसतो
✔ स्पेस मिशनमध्ये उपकरणे कशी टिकतात
हे सर्व अत्यंत कमी वेळात तपासता येणार आहे.
‘स्पेस आणि टाइम कॉम्प्रेस’ म्हणजे काय?
वैज्ञानिकांच्या मते या सेंट्रिफ्यूजमुळे काही प्रक्रिया ज्यांना शेकडो वर्षे लागली असती, त्या आता काही दिवसांत किंवा आठवड्यांत पाहता येतात. म्हणूनच काहीजण याला “स्पेस आणि टाइम कॉम्प्रेशन मशीन” असेही म्हणत आहेत.
आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी खुले
या सुविधेत जगभरातील विद्यापीठे, उद्योग, संशोधन संस्था या सर्वांना प्रयोग करण्याची संधी दिली जाणार आहे. म्हणजेच ही सुविधा केवळ चीनपुरती मर्यादित नाही.
वैज्ञानिकांचा मोठा दावा
प्रोफेसर चेन युनमिन यांनी सांगितले की, “आम्ही असे प्रयोग करणार आहोत, जे काही मिलीसेकंदांपासून ते हजारो वर्षांपर्यंतच्या प्रक्रियांना कव्हर करतील. यातून पूर्णपणे नवीन सिद्धांत शोधले जाऊ शकतात.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा