

तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती होत असताना सायबर गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये इंटरनेटद्वारे कुणाला फॉलो करणे, कुणाचा खासगी डेटा चोरणे, कुणाचा खासगी डेटा न मागता वापरणे, कुणाच्या खासगी डेटाशी न विचारता छेडछाड करणे, अश्लीलता, फसवणूक इत्यादींचा समावेश आहे. लोकांच्या गोपनीयतेचा आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांचा विचार करून, भारत सरकारने एक सायबर क्राईम पोर्टल सुरू केले आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या तक्रारी त्वरित नोंदवू शकतात. घरबसल्या सायबर क्राईमची तक्रार कशी करता येईल (Cyber Fraud Tips In Marathi) ते जाणून घेऊया.
सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल
सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही सायबर गुन्ह्याशी संबंधित तक्रारी नोंदवू शकता. या पोर्टलच्या मदतीने लोक हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक, ओळख चोरी, सायबर बुलिंग आणि विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार करू शकतात.
तक्रार कशी करायची?
- ‘अन्य सायबर गुन्हा नोंदवा’ बटणावर क्लिक करा.
- ‘Citizen Login’ पर्याय निवडा आणि नाव, ईमेल आणि फोन नंबर यासारखी माहिती द्या.
- तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा, कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- पुढील पृष्ठावर, तुम्हाला ज्या सायबर गुन्ह्याची तक्रार करायची आहे त्याबद्दल माहिती द्या.
- हा फॉर्म चार भागांमध्ये विभागलेला आहे – घटना, संशयित, तक्रार तपशीलांसह प्रीव्यू आणि सबमिट करा. प्रत्येक भागात विचारलेली आवश्यक माहिती द्या.
- माहिती व्हेरिफाईड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
हेल्पलाइन क्रमांक 1930 ही सायबर गुन्ह्यांच्या घटनांची तक्रार करण्यासाठी देशव्यापी टोल-फ्री हेल्पलाइन आहे.
हेही वाचा – लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये कशावरून राडा झाला? गंभीर श्रीशांतला काय म्हणाला?
फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींचे अनुसरण करा
- तुमचा वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका.
- कोणत्याही ऑफरच्या लिंकवर क्लिक करू नका.
- पॅन कार्डचा पिन, कार्ड नंबर, आधार, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड कोणाशीही शेअर करू नका.
- वेगवेगळ्या खात्यांसाठी नेहमी वेगवेगळे पासवर्ड वापरा. सावध रहा आणि सुरक्षित रहा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!