Maharashtra High Alert : नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यातील प्रमुख ठिकाणी तसेच मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूरमध्ये कडक बंदोबस्त
मुंबई पोलिसांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांतील पोलीस युनिट कमांडर आणि आयुक्तांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक शहरात तपासणी आणि गस्त वाढविण्यात आली आहे.
STORY | Delhi blast: Maharashtra on high alert; Mumbai, key railway stations under tight security
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2025
A high alert has been issued in Maharashtra following a blast in a car near the Red Fort metro station in New Delhi, and security has been stepped up at vital installations in… pic.twitter.com/VEZzGqOGeS
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली आणि वसई अशा सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर Government Railway Police (GRP) आणि Railway Protection Force (RPF) कडून विशेष तपासणी सुरू आहे.
रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्क्वॉड, श्वान पथक आणि बॉम्ब डिस्पोजल टीम सक्रिय करण्यात आली आहे. प्रवाशांना अनोळखी वस्तूंना हात न लावण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संवेदनशील ठिकाणांवर ATS आणि QRT सक्रिय
नागपूरमध्ये ATS आणि Quick Response Teams (QRT) कडून गर्दीच्या भागात आणि धार्मिक स्थळांवर विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सर्व DCP आणि पोलीस स्टेशन प्रमुखांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
After Delhi Bl@st, Mumbai on High Alert — Dog Squad Deployed:
— ARCLANTIC (@arclanticltd) November 11, 2025
Following the Red Fort bl@st in Delhi, Mumbai has been placed on high alert. Dog squads and security teams have been deployed at major locations, including Kalyan railway station.
Citizens are urged to stay cautious… pic.twitter.com/M1M6uiWcE5
SP (Rural) डॉ. हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, रामटेक गड मंदिर, स्फोटक कारखाने आणि बाजारपेठा यांसारख्या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा – Delhi Red Fort Car Blast : लाल किल्ल्याजवळील स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑईल आणि डेटोनेटरचा वापर
राज्यात तपासणी मोहीम, संशयास्पद वाहनांवर लक्ष
मुंबईत दहिसर, ठाणे, वाशी आणि ऐरोली येथील प्रवेशद्वारांवर पोलिसांनी नाके बंदी सुरू केली आहे. प्रत्येक वाहन आणि व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जात आहे. यासोबतच Anti Terrorism Squad (ATS) आणि प्रत्येक पोलीस ठाण्यातील Anti Terrorism Cell (ATC) सक्रिय करण्यात आले आहे.
गर्दीच्या बाजारपेठा, मंदिरं, शाळा, महाविद्यालयं आणि बसस्थानके येथे पोलिसांचे बळ वाढविण्यात आले आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित पोलीसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरात वाढलेली चिंता, महाराष्ट्र सज्ज
दिल्लीतील या स्फोटाने पुन्हा एकदा देशातील सुरक्षेच्या बाबतीत चिंता निर्माण केली आहे. भूतकाळातही मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे या वेळी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखीम न घेता सतर्क राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा