

Digital Loan : लवकरच देशातील कर्ज प्रणालीही पूर्णपणे डिजिटल होईल. UPI ने ज्या प्रकारे पेमेंट सिस्टीम सोपी केली आहे, त्याच प्रकारे काही क्लिकवर केवळ वैयक्तिक कर्जच नाही तर गृहकर्ज देखील सहज उपलब्ध होणार आहे, तुम्हाला बँकांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. वाढत्या डिजिटलायझेशनच्या युगात, आता भारतीय बँक कर्ज प्रणाली देखील पूर्णपणे डिजिटल होण्याच्या प्रक्रियेत आहे. वैयक्तिक कर्जापासून ते गृहकर्जापर्यंत सर्व प्रकारची कर्जे काही मिनिटांत मिळू शकतात.
7 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळेल कर्ज!
पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) यांसारख्या वैयक्तिक माहितीसह ग्राहक अॅप किंवा वेबसाइटद्वारे कर्जासाठी अर्ज करेल. या माहितीच्या आधारे, बँक एआय आणि सोशल मीडियाद्वारे ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, सुरक्षित आणि असुरक्षित डेटा गोळा करेल. ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअर आणि इतर माहितीच्या आधारे ग्राहकाला कर्ज देता येईल की नाही हे बँक ठरवेल. जर सर्व काही ठीक झाले तर, तुम्हाला बँकांमध्ये न फिरता काही क्लिकवर गृहकर्ज मिळेल. यास किमान 7 मिनिटे आणि कमाल 15 दिवस लागतील. जर सर्व काही ठीक झाले तर, बँकांमध्ये न फिरता, तुम्हाला काही क्लिकवर 7 मिनिटांत गृहकर्ज मिळेल.
बँकांकडून गृहकर्ज घेणे ही एक किचकट प्रक्रिया आहे, म्हणूनच काही मिनिटांत सहज कर्ज मिळविण्यासाठी बरेच लोक NBFCs (नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या) कडे वळतात. मात्र तेथे त्यांना जास्त व्याज द्यावे लागते. अशा परिस्थितीत, आपले ग्राहक गमावण्याऐवजी, बँक आता आपल्या अॅप किंवा वेबसाइटद्वारे कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करत आहे. डिजिटल आणि पेपरलेस मंजुरीमुळे बँकांचा खर्चही कमी होत आहे.
हेही वाचा – Rahul Gandhi : मोठी बातमी..! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; वाचा नेमकं घडलं काय!
NESL म्हणजेच नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडमुळे गृहकर्ज किंवा कोणत्याही कर्जाचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. NESL ही अशी एक संस्था आहे किंवा सरकारी कंपनी म्हणा ज्यात डिजिटल स्वरूपात दिलेल्या प्रत्येक कर्जाचा तपशील असतो. कर्जाची डिजिटल मंजुरी सुलभ करण्यासाठी, NESL तुमच्या आधारद्वारे ई-स्वाक्षरीची सुविधा देखील प्रदान करते. एवढेच नाही तर स्टॉकहोल्डिंग कॉर्पोरेशनसोबत मिळून ई-स्टॅम्पिंगचीही व्यवस्था करते. ज्या राज्यांमध्ये ई-स्टॅम्पिंगची सुविधा सुरू झालेली नाही, तेथेच ही समस्या येऊ शकते. NESL कडे डी-मॅट फॉर्ममध्ये प्रत्येक कर्जाचा संपूर्ण तपशील असतो. तुमचा डेटा आणि NESL च्या या सुविधांचा वापर करून, बँकांना गृहकर्ज किंवा उर्वरित कर्ज मंजूर करणे शक्य आहे.
बँकांनाही नफा
डिजिटल कर्ज मंजूरीमुळे बँकांच्या ग्राहकांची संख्या वाढली असून डिजिटल बँकिंगमुळे अनेक बँकांचा व्यवसाय 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. कर्जाच्या कागदविरहित मंजुरीमुळे बँकांच्या कामकाजाचा खर्चही कमी झाला आहे, परिणामी नफा वाढत आहे. भारतीय बँका ज्या प्रकारे पेमेंट सिस्टीमसारख्या कर्ज प्रणालीचे डिजिटलायझेशन करण्यात गुंतल्या आहेत, त्यामुळे पुढील वर्षापर्यंत 100 टक्के कर्जे डिजिटल स्वरूपात दिली जातील अशी अपेक्षा आहे.