

E-Shram Yojana : भारत सरकार गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये सरकार गरिबांना आर्थिक मदतही करते. यासाठी अनेक योजनांमध्ये गरिबांना कमी किमतीत किंवा मोफत धान्यही उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर अनेक योजनांमध्ये गरिबांसाठी आरोग्य विमाही उपलब्ध करून दिला जातो. याच क्रमाने सरकारकडून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही एक योजना राबवली जात आहे. यासाठी भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ई-श्रम योजना सुरू केली.
कामगारांना मिळतो लाभ
सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक ई-श्रम पोर्टलही सुरू केले आहे. ई-श्रम पोर्टलचा उद्देश असंघटित कामगारांचा डाटाबेस गोळा करणे हा आहे जेणेकरून त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला लेबर कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करावा लागतो. या कार्डच्या मदतीने मजुरांना खूप फायदा होतो.
सरकारी योजनांमध्ये प्रवेश
ई-लेबर कार्डद्वारे असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांना ६० वर्षांनंतर पेन्शन, मृत्यू विमा, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत इत्यादी विविध फायदे मिळू शकतात. ई-श्रम कार्डचा उद्देश असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलद्वारे सर्व नवीन सरकारी योजना आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
ई-श्रम कार्डचे फायदे
- १) कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालयांमार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ लागू करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
- २) ज्या व्यक्तीकडे ई-लेबर कार्ड आहे ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत २ लाखांच्या अपघात विमा संरक्षणासाठी पात्र आहे. अशा परिस्थितीत त्यांना लाखोंच्या विम्याचा लाभही मिळतो.
- ३) ई-लेबर पोर्टल असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा केंद्रीकृत डेटाबेस ठेवेल.
- ४) या योजनेंतर्गत दिले जाणारे सर्व सामाजिक सुरक्षा लाभ या पोर्टलद्वारे थेट असंघटित कामगारांपर्यंत पोहोचवले जातील.