

मुंबई : इंग्लंडचा कसोटी कप्तान बेन स्टोक्सनं वयाच्या ३१व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळेल. सोशल मीडिया हँडलवर त्यानं आपल्या निवृत्तीची माहिती दिली. ”मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना खेळणार आहे”, असं त्यानं म्हटलं.
काय म्हणाला स्टोक्स?
”मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटलाय. हा प्रवास माझ्यासाठी खूप छान होता. आता या फॉरमॅटमध्ये मी आपल्या संघासाठी १०० टक्के देऊ शकत नाही. आता मला तिन्ही फॉरमॅटमध्ये इतकं चांगलं क्रिकेट खेळता येणार नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय”, असं स्टोक्सनं आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
One of the greatest knocks in a World Cup 🖤
Ben Stokes retires from ODI cricket as a England hero ✨pic.twitter.com/jmTt0w48Z6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 18, 2022
🚨 BREAKING NEWS 🚨
Ben Stokes will retire from ODI cricket following tomorrows game at Durham.
Won us the World Cup, job done ✅ pic.twitter.com/2nJd6UVgIs
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) July 18, 2022
11 years and countless ODI memories ❤️
Thank you, @benstokes38 👏 pic.twitter.com/TroqvkZwsw
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022
”यापुढं माझे बाकीचे सहकारी संघात स्थान मिळविण्यासाठी कमी पात्र नाहीत. विशेषत: वेळापत्रक आणि आमच्याकडून अपेक्षित कामगिरी पाहता मला आता तिन्ही फॉरमॅट खेळणं शक्य नाही. हे खूप थकवणारं आहे. माझं शरीर मला निराश करत आहे, मला असे वाटते की मी दुसऱ्या खेळाडूची जागा घेत आहे. आता आणखी एका क्रिकेटपटूसाठी क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची आणि मी गेल्या ११ वर्षांत केलेल्या काही उत्कृष्ट आठवणी लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे”, असंही स्टोक्सनं म्हटलं.
स्टोक्स पुढं म्हणाला, ”आता मी माझं सर्व लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित करणार आहे. मला वाटतं की या निर्णयामुळं मी पूर्ण निष्ठेनं टी-२० फॉरमॅट खेळू शकेन. मी जोस बटलर, मॅथ्यू पॉट, सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला यशासाठी शुभेच्छा देतो. गेल्या सात वर्षांत आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे आणि आता भविष्य उज्ज्वल दिसत आहे.”
स्टोक्सची वनडे कारकीर्द
बेन स्टोक्सनं २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून पदार्पण केलं. त्यानं इंग्लंडकडून १०४ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यानं ३९.४५च्या सरासरीनं २९१९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १०२ आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं ३ शतकं आणि २१ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत त्यानं ८७ डावात ७४ बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट ६.०३ होता. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी ६१ धावांत पाच विकेट अशी आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत एकदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.