पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 3 वर्षांचा तुरुंगवास!

WhatsApp Group

Imran Khan : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. इम्रान खान यांच्यावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, शनिवारी इस्लामाबादमधील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात ‘भ्रष्टाचार’प्रकरणी इम्रान खान यांना दोषी ठरवले.

लाहोरमधून अटक

इम्रान यांच्याविरोधात निर्णय येताच पाकिस्तान पोलिसांनीही कारवाई केली आहे. त्यांना लाहोरमधून अटक करण्यात आली आहे. या खटल्यात शिक्षा झाल्यामुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान सहभागी होण्याची शक्यता कमी आहे आणि तो 5 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाही.

हेही वाचा – 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेलमध्ये फरक काय? समजून घ्या!

काय आहे तोशाखाना प्रकरण?

2018 ते 2022 दरम्यान सरकारी भेटवस्तू विकून पैसा कमावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर होता. या भेटवस्तू इम्रान यांना त्यांच्या परदेश दौऱ्यात मिळाल्या होत्या. पाकिस्तानच्या कायद्यानुसार या भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरीमध्ये (तोशाखाना) ठेवाव्या लागतात. तथापि, जर कोणत्याही पंतप्रधानांना त्यांना आपल्याजवळ ठेवायचे असेल तर त्याला लिलावात किंमत मोजावी लागेल.

इम्रान यांनी या भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि 5 कोटींहून अधिक रुपयांना विकून मोठा नफा कमावल्याचा आरोप आहे. या भेटवस्तूंमध्ये महागड्या कार, पेन आणि महागड्या अंगठ्यांचाही समावेश होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment