

Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात आज २३ जानेवारी २०२३ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्याचा भाव ५७ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ६७ हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५७१३८ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ६७९४७ रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी ५७३२२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज सकाळी ५७१३८ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ५६९०९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी ९१६ शुद्धतेचे सोने आज ५२३३८ रुपये झाले आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४२८५४ वर आला आहे. त्याच वेळी, ५८५ शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते ३३४२६ रुपयांवर आले आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ६७९४७ रुपये झाला आहे.
हेही वाचा – कर्जाचा EMI चुकवला तर काय होईल? घाबरू नका, ‘या’ ४ गोष्टी लगेच करा!
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!