मेकअप करायला जाताना वधूचा अपघात, लग्नाच्या दिवशीच गंभीर जखमी, नवऱ्याचा डोळ्यात पाणी आणणार निर्णय

WhatsApp Group

Hospital Wedding : लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. पण तामिळनाडूतील अलप्पुझा येथील अवनी आणि तिचा होणारा नवरा शेरोन यांच्यासाठी हा दिवस आयुष्यातील सर्वांत मोठी परीक्षा ठरला.

शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ठरलेल्या शुभमुहूर्तात दोघांचे लग्न पार पडणार होते. परंतु त्याआधीच अवनी ज्या कारने मेकअपसाठी कुमाराकोमकडे जात होती, त्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि संपूर्ण वातावरणात दुःखाचं सावट पसरलं.

अपघातात गंभीर जखमी

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, अपघात पहाटे 3 वाजता घडला. कार अनियंत्रित होऊन मोठ्या वेगाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडावर आदळली. अवनीला गंभीर जखमा झाल्या आणि तातडीने प्रथम कोट्टायम मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले. नंतर पाठीच्या कण्याला (स्पाईन) गंभीर दुखापत झाल्याने तिची कोचीतील VPS लेकशोर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितले की अवनीच्या रीढेच्या हाडांना गंभीर इजा झाली असून तिला ताबडतोब शस्त्रक्रियेची गरज आहे. ही शारीरिक आणि मानसिक वेदनेची वेळ असतानाही अवनी आणि शेरोन दोघांनीही आशा सोडली नाही.

हॉस्पिटलच बनलं विवाहमंडप

अपघाताची बातमी कळताच शेरोन संपूर्ण कुटुंबासह रुग्णालयात धावले. परिस्थिती कितीही कठीण असो, शेरोनने लग्न पुढे ढकलण्यास नकार दिला. रुग्णालय प्रशासनाने भावना समजून नियमांची अडचण बाजूला ठेवत विवाहाची परवानगी दिली. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीश करुणाकरण यांच्या देखरेखीखाली इमर्जन्सी विभागातील एक कक्ष काही वेळासाठी वधूचा कक्ष बनवण्यात आला.
ठरलेल्या मुहूर्तानुसार दुपारी 12:15 ते 12:30 दरम्यान, हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या अवनीचा हात हातात घेत शेरोनने तिच्या गळ्यात मंगलसूळ बांधले. या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते… कारण हा प्रेमाचा साक्षात विजय होता.

शेरोन अलप्पुझा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. लग्नासाठी तयार केलेल्या रिसेप्शन वेन्यूवर आलेल्या पाहुण्यांची देखील व्यवस्थित सोय करण्यात आली. मेन्यूनुसार सर्वांना भोजनही देण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment