Human Washing Machine : जगभरात तंत्रज्ञानाचे नवनवीन चमत्कार पाहायला मिळतात; पण यावेळी जपानने खरोखरच अविश्वसनीय अशी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अधिकृतपणे लाँच करण्यात आलेली ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’ ही अशी भविष्यवादी पॉड मशीन आहे, ज्यात व्यक्ती आडवी झोपते, झाकण बंद होते… आणि पुढची सगळी कामे मशीन करते पूर्ण शरीर स्वच्छ करते, फोम वॉश देते, सौम्य मसाज देते आणि पार्श्वभूमीला रिलॅक्सिंग म्युझिकसुद्धा!
हे संपूर्ण अनुभव इतके आलिशान आहे की पारंपरिक आंघोळीपेक्षा हे पूर्णपणे स्पा थेरपीसारखे वाटते. जपानमधील Science या कंपनीने ही मशीन तयार केली असून ओसाका येथे झालेल्या World Expo मध्ये ती सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. सहा महिन्यांच्या एक्स्पोदरम्यान या पॉडला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि लांबच लांब रांगा लागत राहिल्या.
🚨Japan Unveils 'Human Washing Machine' That Can Clean And Dry Your Body In 15 Minutes.
— Indian Infra Report (@Indianinfoguide) December 8, 2024
promising to revolutionise personal hygiene and relaxation. pic.twitter.com/EbNa1qaCv9
अमेरिकन रिसोर्ट कंपनीनेही मागणी केली!
प्रदर्शनात मशीनची लोकप्रियता इतकी वाढली की अमेरिकेतील एका मोठ्या रिसोर्ट ग्रुपने Science कंपनीशी थेट संपर्क साधला, “ही मशीन आम्हाला खरेदीसाठी मिळू शकते का?”
याच विनंतीने कंपनीला या मशीनचे कमर्शियल प्रॉडक्शन सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कल्पना अगदी नवी नाही! 1970 च्या ओसाका एक्स्पोमध्ये याच प्रकारची ‘फ्युचर ह्यूमन वॉशर’ संकल्पना दाखवली गेली होती. तेव्हाच Science कंपनीचे सध्याचे अध्यक्ष, तेव्हा फक्त दहा वर्षांचे, या आयडियाने प्रेरित झाले होते.
हृदयगतीही मॉनिटर होते, पूर्ण सुरक्षितता!
या मशीनमध्ये केवळ पाण्याचे जेट्स आणि फोम नसून, वापरकर्त्याची हृदय गती व इतर महत्त्वाच्या शारीरिक क्रिया सतत मॉनिटर केल्या जातात. त्यामुळे अनुभव आरामदायी आणि पूर्णपणे सुरक्षित राहतो.
या अनोख्या मशीनची पहिली युनिट ओसाका येथील एका हॉटेलने खरेदी केली असून, ती आपल्या प्रीमियम गेस्टसाठी खास सेवेसारखी उपलब्ध करणार आहे. याशिवाय, जपानमधील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स चेन Yamada Denki नेही मशीन खरेदी केली आहे, जेणेकरून ग्राहकांना एक दुर्मिळ व अनोखे आकर्षण दाखवता येईल.
हेही वाचा – 17 वर्षाच्या आदित्यने बनवली AI रोबो टीचर, सर्वत्र चर्चेचा विषय, शिक्षक नसले की शिकवणार!
किंमत सुमारे ₹3.2 कोटी!
Science कंपनीने जाहीर केले आहे की ही मशीन फक्त 50 युनिट्स तयार केली जाणार आहेत, जेणेकरून तिची एक्सक्लुसिव्हिटी टिकून राहील. स्थानिक अहवालानुसार एका मशीनची किंमत सुमारे 60 मिलियन येन (₹3.2 कोटी) इतकी आहे.
भविष्यकाळात आंघोळ कशी असावी—याचा एक नवा अध्याय जपानने सुरू केला आहे. हात न लावता, पूर्ण ऑटोमेटेड, रिलॅक्सिंग ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’ आता वास्तवात आली आहे… आणि वैयक्तिक केअरच्या संकल्पना बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा